पुणे : भारतात सध्या ‘हायपरलूप’ (Hyperloop) हे तंत्रज्ञान शक्य नाही, भारतात हे तंत्रज्ञान अत्यंत प्राथमिक अवस्थेमध्ये आहे. शिवाय सध्याच्या परिस्थितीमध्ये ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारेही नाही, असे मत व्यक्त करत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी ‘हायपरलूप’ या येत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाला भारताची दारे बंद असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारने ‘व्हर्जिन हायपरलूप’ तंत्रज्ञानाची उपयोगिता आणि […]
Rajasthan Accident: राजस्थान येथील दौसा येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात (A terrible accident) झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून रेल्वे रुळावर कोसळली. या भीषण अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले. हाती आलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. दौसा जिल्ह्यात (Dausa district) सोमवारी […]
Ban 22 illegal betting apps : ऑनलाइन बेटिंग आणि जुगार अॅपच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचं आमिष दाखवलं जात. त्याला भुलून अनेकजण पैसे लावतात. यात अनेकांची घरे उद्ध्वस्त होतात. महादेव बेटिंग अॅप (Mahadev Betting App) प्रकरणी सातत्याने तक्रारी येत असतांना त्यावर सरकारकडून कुठहीही कारवाई होत नव्हती. अखेर आज केंद्र सरकारने (Central Govt) महादेव बेटिंग अॅपसह आणखी 22 […]
नवी दिल्ली : यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) याने त्याच्या प्रतिमेला धक्का पोहचविल्याचा आरोप करत भाजप (BJP) खासदार मेनका गांधी (Maneka Gandhi) यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. नशेसाठी सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी मनेका गांधी यांच्या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने हा इशारा दिला आहे. याशिवाय याबाबत लवकर एक व्हिडीओ […]
गडचिरोली : महाराष्ट्र-तेलंगण सीमेवर तब्बल 80 हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेले मेडीगड्डा धरणाचे (Medigadda barrage) बांधकाम सदोष असून भविष्यातील धोका लक्षात घेत संपूर्ण धरणच नव्याने बांधण्याची सुचना ‘नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी’च्या (NDSA) समितीने तेलंगणा सरकारला केली आहे. याबाबतचा अहवाल नुकताच केंद्राला सादर करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणुकांचे वातावरण असताना आणि प्रचार सुरु असतानाच हा […]
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना धमकी देत 400 कोटी खंडणी मागितल्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आणखी एका तरुणाला अटक केली आहे. राजवीर खंत (21) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्यानेच सर्वात आधी shadabchan@mailfence.com हा ईमेल आयडी वापरून शादाब खान नावाने ईमेल पाठवला होता आणि 20 कोटींच्या खंडणीची मागणी केली […]