Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सर्व अकरा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. पश्चिम बंगालमधील सहा, गुजरातमधील तीन आणि गोव्यातील एका जागेवर मतदानाची गरज नाही. पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत मतदान होणार नाही. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभेसाठी 24 जुलै रोजी मतदान होणार […]
Opposition Parties Meeting : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा विरोधकांची बैठक पार पडत आहे. आज (17 जुलै) आणि उद्या (18 जुलै) बंगळुरूमध्ये विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. या बैठकीचा अजेंडा आणि मिनिट टू मिनिट कार्यक्रमही ठरविण्यात आला आहे, त्यामुळे यावेळी प्रचारासाठी संयुक्त अजेंडा ठरविला जाण्याची शक्यता आहे. गत महिन्यात पाटणा येथे नितीश कुमार (Nitish Kumar) […]
New Delhi : अनेक दिवसांपासून केंद्र सरकार आणि आप यांच्यात वाद सुरु आहे. केंद्र सरकारकडून NCCSA अध्यादेश आणत आहे. त्याला मात्र आपकडून विरोध केला जात आहे. त्यासाठी आपकडून देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावर आपला अनेक विरोधी पक्षांनी कॉंग्रेसला साथ देण्याचे मान्य केले आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी अध्यादेशाविरोधात आपला पाठिंबा देण्याची […]
Tomato Price Hike : टोमॅटोच्या वाढत्या किंमतीनी (Toamto Price Hike) देशभरात हाहाकार उडालेला असतानाच आता सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देणारी बातमी आली आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने टोमॅटोच्या वाढत्या किंमती नियंत्रित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून टोमॅटो सरकारी किंमतीवर 80 रुपये प्रति किलो या दराने विक्री करावेत, असे आदेश दिले आहेत. याआधी मंत्रालयाने एक किलो […]
Madhya Pradesh : मध्य प्रदेश येथील गुना येथे खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. या वेदनादायक घटनेने सर्वांनाच हादरवले आहे. गोपीकृष्ण सागर धरणाजवळील खड्ड्यात दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण व्यापारी विवेक शर्मा यांचा मृतदेह सापडला आहे. 42 वर्षीय विवेक शर्मा 12 जुलैपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. झडतीदरम्यान, पोलिसांनी तलावाजवळ मृतदेह ताब्यात […]
UP Politics : लोकसभा निवडणुकांच्या आधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांना द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर सपाचे आमदार दारासिंह यांनी आमदारकीचा राजीनामा देत अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना दुसरा झटका दिला. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली आहे. श्री @oprajbhar जी […]