Stolen tomatoes : गेल्या महिनाभरात टोमॅटोचे दर (Tomato rates) गगणाला भिडले आहेत. पावसाळ्यात टोमॅटोबरोबरच इतर भाज्यांच्या दरातती कमालीची वाढ होत असते. मात्र, टोमॅटोने हाईटच केली. टोमॅटोच्या किंमतींनी शंभरी पार केली. त्यामुळं आता चोरट्यांची नजर टोमॅटोवर पडत आहे. अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटना घडत आहेत. अशात आता बेंगळुरूमध्ये काही चोरट्यांनी टोमॅटोने भरलेला अख्खा ट्रक लुटला आहे. […]
केंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसला आहे. ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना तिसऱ्यांचा मुदतवाढ देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. ईडी प्रमुखांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देणे योग्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. Supreme Court says, extension of tenure of ED Director Sanjay Kumar Mishra […]
भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला असून भारताचे गरीबीत लक्षणीय घट केली आहे. मागील 15 वर्षांच्या कालावधीत भारतात 41.5 कोटी नागरिकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन ते गरीबीच्या पेचातून बाहेर पडले असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या अहवालात करण्यात आला आहे. भारतात मागील 15 वर्षांत जवळपास 41.5 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर पडल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या […]
देशातील आघाडीचा उद्योग समूह टाटा लवकरच अॅपल कंपनीचा कारखाना ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. यासाठीचा करार अंतिम टप्प्यात असून साधारण ऑगस्टमध्ये प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे स्थानिक कंपनी आयफोन निर्मितीच्या क्षेत्रात उतरेल असे पहिल्यांदाच घडणार आहे. देशात आयफोन तयार करणाराही उद्योग समूह बनेल. विस्ट्रॉन कॉर्प हा कारखाना दक्षिणी कर्नाटकात आहे. या कारखान्याची […]
Bihar Politics : देशातील विरोधी पक्षांची एकी करून भाजपला (BJP) टक्कर देण्याचा प्लॅन तयार करत असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांना आणखी एक धक्का बसला आहे. शोषित इंकलाब पार्टीने एनडीए बरोबर जाण्याची घोषणा केली आहे. पार्टीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री नागमणि कुशवाहा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेत या निर्णयाची […]
Maharashtra Congress : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामध्ये विरोधी पक्ष देखील केंद्रातील भाजप सरकारविरोधात एकवटल्याचं पाहायला मिळत आहेत. तर त्यात आज महाराष्ट्र कॉंग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये पार पडणार आहे. ही बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यत्र मल्लिकार्जुन खरगे आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. (Maharashtra Congress Meeting […]