Ram Mandir : …हे भाजपचं षडयंत्र; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकरल्यानंतर खरगेंची टीका

Ram Mandir : …हे भाजपचं षडयंत्र; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकरल्यानंतर खरगेंची टीका

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या ( Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याचे टाळले आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी 22 तारखेलाच राम मंदीरात यावं हे भाजपचं षडयंत्र आहे. म्हणत टीका केली आहे.

सोनं चोरलं, मातीत पुरलं अन् डिटेक्टरनं शोधलं; पुणे पोलिसांनी असा लावला चोरीचा शोध…

गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले होते. मात्र करोडो भारतीय प्रभू रामाची पूजा करतात. धर्म ही माणसाची वैयक्तिक बाब आहे, पण गेल्या काही वर्षांत भाजप आणि आरएसएसने अयोध्येतील राम मंदिराला राजकीय स्वरुप बनवले आहे.

Chhatrapati Sambhaji : ‘छत्रपती संभाजी’ मराठी रुपेरी पडद्यावर…पहिले पोस्टर रिलीज…

या करणामुळे या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) उपस्थित राहणार नसल्याचे काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे. यासोबतच लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजनही यात सहभागी होणार नाहीत. काँग्रेस नेत्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामाच्या भक्तीत तल्लीन, टाळ वाजवला, भजन केलं; पाहा फोटो

त्यानंतर या विषयावर आपली प्रतिक्रिया देताना खरगे यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ज्यांना रामावर श्रद्धा आहे. ते लोक अगोदर किंवा नंतर देखील अयोध्येला जाऊन प्रभु श्रीरामांचं दर्शन घेतील पण भाजप पुन्हा-पुन्हा आमच्या राम मंदीर सोहळ्याला न येण्यावरून प्रश्न विचारत आहे. 22 तारखेलाच राम मंदीरात यावं हे भाजपचं भाजपचं षडयंत्र आहे. अशी टीका खरगे यांनी केली.

दरम्यान कॉंग्रेसच्या नेत्यांच्या अयोध्येला न येण्याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी निवेदन जारी करून म्हटले आहे की, निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी अर्ध्या बांधलेल्या मंदिराचे उद्घाटन केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा 2019 चा निर्णय स्वीकारून आणि लोकांच्या श्रद्धेचा आदर करून मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी यांनी या कार्यक्रमासाठी भाजप आणि आरएसएसचे निमंत्रण आदरपूर्वक नाकारले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube