एसटी महामंडळाला 120 कोटी, पगार 7 तारखेला होणार ; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik On ST Employee Salary : एसटीतील (MSRTC) पगारासाठी 120 कोटी सरकार तातडीने देणार असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Pratap Sarnaik) मोठी घोषणा केली आहे. तसेच एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, परिवहन सेवा प्रवासीभिमुख आणि दर्जेदार करण्यासाठी अजून काही चांगले निर्णय घेणार असल्याचं देखील सरनाईक यांनी (ST Employee Salary) स्पष्ट केलंय.
प्रताप सरनाईक यांनी (ST Corporation) म्हटलं की, 176 कोटीची मागणी होती, ती 120 कोटी मायनस करून उर्वरित रक्कम टप्पा टप्प्यांत देण्याचं वित्त विभागाने मान्य केलेलं आहे. जे पैसे आम्ही मागतोय, त्याचं ऑडिट करून त्याचा प्रस्ताव खात्याला सादर करणार आहे. त्यामुळे सकारात्मक निर्णय झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही. पुढील महिन्यापासून सात तारखेला बॅंकेमध्ये त्यांचा पगार पोहोचला जाईल.
राज्यपाल हे पंतप्रधानांचे नोकर असल्यासारखं वागतात; उल्हास बापट नेमकं काय म्हणाले?
ज्या योजना आहेत, त्या योजनांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या योजना घोषित केल्या. त्या योजनांचा एसटी महामंडळाला फायदाच झालेला आहे. महिलांना पन्नास टक्के प्राधान्य दिलं, त्यांना मोफत प्रवास दिला. त्याचबरोबर 75 वर्षावरील नागरिकांना जो मोफत प्रवास दिलाय. त्याचाही फायदा महामंडळाला झाला. त्याची प्रतिकृती राज्यशासनाच्या माध्यमातून होत असते. फक्त ती वेळेवर न झाल्याने असे संकट निर्माण झाले. परंतु भविष्यात असं संकट निर्माण होणार नाही, असं देखील राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय.
स्टॅलिनसारखी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली असती तर…कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी केला मोठा खुलासा
प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालवली, दुकाने लावले होते. यावर बोलताना ते म्हणाले की, तळागाळातला आलेला कार्यकर्ता, आलेला माणूस इथपर्यंत पोहोचल्यानंतर गरिबी काय असते, त्याची कल्पना त्याला असते. आठ-दहा वर्षे रिक्षा चालवली. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबानी देखील सांगितलं होतं की, आम्ही सोबत काम करत होतो. ऑम्लेट पाव, भुर्जी पावचा व्यवसाय देखील आम्ही केलाय. व्यवसाय करायला कोणत्याही प्रकारची लाज-शरम बाळगायची गरज नाही. याठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे, असं देखील प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय.
याप्रकरणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा 44 टक्के उर्वरित पगार देण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब 120 कोटी एसटी महामंडळाला हस्तांतरित करणार, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.