नागपूर : लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. चौकशी समितीनेही त्यांना दोषी ठरवले असताना त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केलीय. पटोले म्हणाले की, […]
मुंबई : दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभागृहातील गदारोळानंतर ही घोषणा केलीय. विशेष म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. त्यानंतरही आता ही चौकशी होणार असल्याने सत्ताधारी विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु […]
मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये ज्याप्रकारे आफताबची नार्को टेस्ट केली त्याप्रमाणे आदित्य ठाकरेंची देखील नार्को टेस्ट करा सुशांत सिंह केसमधील सत्य समोर येईल अशी मागणी नितेश राणे यांनी केली. माध्यमांशी बोलताना राणे यांनी आदित्य ठाकरे वर टीका करत त्यांच्यावर गंभीर आरोप देखील […]
नागपूरः भूखंडाच्या आरोपावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरले आहे. आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घेतले खोके, भूखंड ओके अशी नवी घोषणाही यावेळी देण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून भूखंडावरून मुख्यमंत्र्यांवर महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यावरून सभागृहात गोंधळ झाला आहे. सभागृहाच्या बाहेरही विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांना घेरण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाबाहेर विरोधकांकडून […]
मुंबई : राज्याचे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. सध्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी होत आहे. यातच राजकारणातील एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते नागपुरात असतील. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दरम्यान राज्यातील अनेक दिग्गज […]
विशेष प्रतिनिधी, प्रफुल्ल साळुंखे नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजेरी लागणार ही बातमी आली. त्यानंतर विधान परिषद कामकाजात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हा सामना रंगेल का ? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली गेली. पण उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात हजेरी लावली खरी, प्रत्यक्ष कामकाजात उद्धव ठाकरे आणि […]