मुंबई : गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा… पन्नास खोके, एकदम ओके…गुजरात निरमा… ईडी, सीबीआय, आयटी मागे नाही लागणार… वॉशिंग मशीन खोके, आणि गुजरातचा निरमा, (Maharashtra Vidhan Sabha) महाशक्तीला पाठिंबा द्या आणि क्लीनचीट मिळवा… गुजरात निरमा अभियान, चला पवित्र होऊन येऊ…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत जोरदार निदर्शने केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा […]
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी काल विधानपरिषदेमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात तु-तु, मै- मै झाल्याची पहायला मिळाली. यावेळी दोघांनी सभागृहामध्येच एकमेकांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोघांना समज देऊन शांत बसायला सांगितले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे काल विधानपरिषेदत बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या […]
खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. आपल्या विरोधकांना दिलेल्या आव्हानामुळे तर ते कायम चर्चेत येतात. अशीच एक घटना आज पुन्हा घडली आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे देखील कायम एकमेकांच्या समोर येत असतात, आज पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप […]
“भाजप आणि मनसे एकत्र येऊ नये म्हणून काही लोकांनी २०१४ साली २०१७ साली काही चाली खेळल्या आहेत. कारण हे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आले तर हे दोन पक्ष एकत्र आले तर आपलं काय होईल याची उद्धव ठाकरे यांना भीती आहे.” असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. काल विधिमंडळ परिसरात […]
देशातील प्रमुख विरोधी पक्षांची काल बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल ही बैठक घेण्यात आली होती. यासाठी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, कपिल सिब्बल यांच्यासह इतरही पक्षांचे नेते उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी ईव्हीएमवर आरोप केला आहे. ज्या-ज्या ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला त्या ठिकाणी भाजपला मते मिळाली […]
मुंबई : कालच्या आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) माहिम येथील दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता. आणि तिथं हाजी अली दर्गा तयार होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आज या अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम काढून टाकण्यात आलं. दरम्यान,यावर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. […]