पुण्यातील कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection ) प्रचार शिगेले पोहोचला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणुक लागली आहे. या निवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे रिंगणात आहेत. ही निवडणुक जिंकण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री […]
भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे ( NCP ) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshamukh ) हे 2019 साली भाजपमध्ये येणार होते. त्यासाठी ते प्रयत्न करत होते, असा दावा महाजन यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) हे वयाच्या 83 व्या वर्षी ही पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर प्रवास करत असतात. गेल्या चार दिवसांत एखाद्या तरुण नेत्याला लाजवेल असा भरगच्च कार्यक्रम शरद पवार यांनी घेतले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अधिवेशनानंतर पवार यांनी मुंबई, नागपूर, नाशिक, वर्धा असा प्रवास केला आहे. ते ही चार दिवसांमध्ये, […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.मी केलेल्या कामाचे माहिती देणारे बोर्ड हे महापालिकेने काढल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कळव्याच्या पूर्वेला मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत, त्या […]
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर सोबतीला राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे आणि आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही, अशी खोचक टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group ) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान मोदींवर (Prime Minister Modi) करण्यात आली. […]
सातारा : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant)यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group)उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare)यांनी साताऱ्याच्या पाटणमध्ये प्रत्युत्तर दिलंय. अंधारे म्हणाल्या की, आरशात बघून स्वगत बोलणाऱ्या लोकांवर आपण फार व्यक्त न झालेलं बरं. कवी केशवसूत (Keshavsut)यांच्या कवितेमधील एक ओळ सांगून […]