विधानसभेला ठाकरे गट मविआत नसेल, कॉंग्रेस अन् राष्ट्रवादी हे दोनच पक्ष…; संजय शिरसाटांचा दावा
Sanjay Shirsat : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) वेध लागले आहे. सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. अशातच आता शिंदे गटाचे प्रवक्त संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं विधान केलं. विधानसभा निवडणुकीवेळी ठाकरे गट महाविकास आघाडीत नसेल. तथापी, कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) हे दोनच पक्ष मिळून निवडणूक लढवतील, असा दावा शिरसाट यांनी केला.
Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल
संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, शरद पवारांचे गरज सरो आणि वैद्य मरो हे सुरवातीपासून धोरण राहिले आहे. कॉंग्रेस आणि ठाकरे गटात वाद व्हावी ही त्यांची सुप्त इच्छा आहे. त्यानुसार, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत अनेक घडामोडी घडतील. विधानसभेला ठाकरे गट महाविकास आघाडीत नसेल. तथापी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष मिळून निवडणूक लढवतील,असा दावा संजय शिरसाट यांनी केली.
रील पडली महागात, 300 फूट खोल दरीत पडून अन्वी कामदारचा मृत्यू; जाणून घ्या सर्वकाही
विधानसभेला ठाकरे गटाला जास्त जागा देण्यास कॉंग्रेसचा विरोध राहिले. विधानसभेत काँग्रेस आणि ठाकरे गटात युती होणार नाही. काँग्रेसवाले ठाकरे गटाशी बोलत सुध्दा नाहीत, असं शिरसाट म्हणाले.
संजय राऊत ना लोकांना भेटतात, ना कधी ग्राऊंडवर जातात. पवारांना उबाठा गटाच्या पाठीवरचा हात काढला तर त्यांची दयनीय अवस्था होईल. त्यामुळं एकवेळ काँग्रेसच्या जागा वाढतील, पण ठाकरे गटाच्या जागा विधानसभेमध्ये वाढणार नाहीत, असा टोला शिरसाट यांनी लगावला.
महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केल्यानंतर खासदार संजय राऊतांनी महायुतीवर जोरदार टीका केली होती. त्याला आता शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत हा वेडा माणूस फार जास्त वेडा आहे. पंधराशे रुपयांमध्ये घर चालत नाही, हे आम्हालाही मान्य आहे. मात्र, आमची ते तरी देण्याची दानत आहे, तुमचं सरकार असतांना तुम्ही काय दिलं? ते आधी सांगा, असा सवाल शिरसाट यांनी केली.
शरद पवार स्वतः चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी महिलांसाठी काय केले, हा प्रश्न त्यांनी स्वत:लाच विचाराव, असंही शिरसाट म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्ताराविषयी विचारले असता शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, याचा अर्थ विस्तार होईल. पण तो कधी होईल, ही वेळ कुणी सांगू शकत नाही, असं शिरसाट म्हणाले.