खूप संघर्ष पाहतेय, मला पुन्हा आशिर्वाद द्याल; बारामतीकरांसमोर सुप्रिया सुळेही भावूक !
Supriya Sule Baramati Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर काका-पुतण्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. होम ग्राउंड बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार हे एकमेंकावर टीका करू लागले आहेत. कुणी काही म्हणू द्या, शेवटची निवडणूक आहे, असे म्हणून भावनिक करतील पण तुम्ही भावनिक होऊ नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनीही अजित पवारांना घेरले होते. या मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुध्द सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. बारामतीतील पानगल्ली येथील यूथ मेळाव्यातील भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांनीही बारामतीकरांना भावनिक आवाहन केले आहे.
उणीधुणी काढत हेडलाईन मिळवायची, विरोधकांना एवढंच काम; अजितदादांची टोलेबाजी!
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या सत्याच्या लढाईत महाराष्ट्रातील जनता आपल्याला साथ देत आहे. मी बारामतीकरांसमोरही नतमस्तक होत आहे. मला एक-दोन नव्हे तर तीन वेळा तुम्ही दिल्लीला जायची संधी दिली आहे. पुन्हा मला आशिर्वाद द्यावा ही विनंती करत असल्याचे आवाहन सुळे यांनी बारामतीकरांना केले आहे. संसदरत्न म्हणून माझा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते झाला आहे. हा सन्मान माझा नाही, तर बारामतीकरांचा आहे, असे सुळे म्हणाल्या. त्यावेळी बोलताना सुळे या भावूक झाल्या होत्या.
समावेश झाला, बैठका झाल्या पण जागावाटपाचं काय? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं नियोजन
कार्यकर्त्यांना सांभाळताना कसरत !
सुप्रिया सुळे यांनी भाषण करताना काही स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे घेतले. परंतु स्थानिक कार्यकर्ते मासाळकर यांचे नाव घेण्यास सुप्रिया सुळे या विसरल्या. परंतु काही जणांना म्हासाळकरांचे नाव घेण्यास सांगितले. त्यावेळी माझे म्हासाळकर यांच्यावर विशेष लक्ष असल्याचे सुळे यांनी सांगितले. तुम्ही माझ्या आधी भाषण करता का ? अशी विनंती केली. शेवटी मासाळकर हे व्यासपीठावर आले. त्यांचे सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले. त्यावरून दोन्ही गटामध्ये कार्यकर्ते सांभाळण्यासाठी कशी कसरत होत आहे, यावरून दिसून येत आहे.
सुनेत्रा पवारांचेही दौरे
या मतदारसंघातून सुनेत्रा पवार या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सुनेत्रा पवार याही बारामती मतदारसंघातील गावांना भेटी देत आहे. त्यात आता सुप्रिया सुळे यांनीही आपले संपर्क अभियान सुरू केले आहे.