इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 16वा हंगाम संपला आहे. जवळपास दोन महिने चाललेल्या या क्रिकेटच्या महाकुंभात 74 सामने खेळले गेले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने 29 मे (सोमवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव करून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यासह CSK ने सर्वाधिक 5 IPL विजेतेपदे […]
चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023 चा विजेता ठरला. या संघाने अंतिम सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 28 मे रोजी होणारा अंतिम सामना पावसामुळे 29 मे रोजी (रिझर्व्ह डे) खेळला गेला. या दिवशीही पाऊस पडला असला तरी, त्यानंतर चेन्नईने डकवर्थ लुईस नियमानुसार जेतेपदाचा सामना 5 विकेटने जिंकला. आता दरम्यान, चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार […]
India vs Australia WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघांची घोषणा फार पूर्वीच झाली आहे. इंग्लंडमधील परिस्थिती पाहता शार्दुल ठाकूरचा वेगवान अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, कांगारूंचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने हार्दिक […]
Wrestler Protest: गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यामुळे साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटू मंगळवारी गंगा नदीवर आपली पदके टाकण्यासाठी पोहोचले होते, परंतु शेतकरी नेते नरेश टिकैत यांच्या विनंतीनंतर विसर्जन रद्द करुन पुढे पाच […]
TATA IPL dot ball : आयपीएल (IPL) 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. प्लेऑफच्या पहिल्या सामन्यापासू ते अंतिम सामन्यापर्यंत डॉट बॉलच्या ग्राफिक्समध्ये बदल पाहायला मिळाला होता. या मॅचमध्ये फेकल्या जात असलेल्या डॉट बॉलच्या ऐवजी झाडाचे इमोजी (TATA IPL Green Dots) दिसत होती. झाडाच्या इमोजीमागे बीसीसीआयचा पर्यावरणीय उपक्रम होता. प्रत्येक […]
Memories Of IPL 2023 : तितटीच्या सामन्यात धोनीच्या संघाने गुजरात टायटन्सचा पराभाव करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नई संघाच्या पोरांनी करून दाखवलं हे या विजयानंतर बोललं जात आहे. आयपीलचा यंदाचा सीझन काही ना काही कारणांमुळे चर्चेत आला. या मोसमात अतिशय मनोरंजक सामने खेळले गेले. या सीझनमध्ये 59 दिवसांत अनेक खास […]