राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला धूळ चारली आहे. महाविकास आघाडीने सर्वाधिक तीस जागा जिंकल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झालेत.
राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं.
लोकसभेच्या निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला पाणीच पाजलं असल्याचं स्पष्ट झालं. सोलापूर, सांगली, कोल्हापुरात महायुतीला दे धक्का मिळालायं.
गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur) लोकसभा मतदारसंघातून डॉ. नामदेव दासाराम किरसान विजयी झाले आहेत. किरसान हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत.
चंद्रपुरामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी भाजपचे सुधीर मुनगंटीवार (Mungantiwar) यांचा दणदणीत पराभव केला
अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांनी पराभव केला.
राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लीड अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. 48 जागांपैकी 27 जागांवर मविआ पुढं आहे
आम्ही एकत्रित राहू. उद्याचं बैठकीत आम्ही धोरणं ठरवू. उद्याची बैठक ही दिल्लीला होऊ शकतो, असं शरद पवार म्हणाले.
सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) सुमारे 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार भाजपला हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला वीस ते बावीस जागा मिळण्याचा अंदाज आहे.