आज गुन्हेगार आहे म्हणून वापरले गेले. उद्या सामान्य माणसाचं काय? पोलिसाला लागलेल्या गोळीचा मेडिकल रिपोर्ट पुढे आला पाहिजे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली.
राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुप्पटीने वाढ करण्यात आलीय. तसंच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलं आहे.
रविवारी अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले.
पुणे शहरात नव्याने विमानतळ उभारण्यात येत आहे. या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नावं द्यावं.
ज्या काँग्रेसनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलं धोका दिला त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर वार केले.
जवळपास 50 ते 60 वर्ष शरद पवार यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता होती. मात्र, त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटण्याचं काम केलं.
अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात रासायनिक वायूगळती झाली आहे. नागरिकांत घबराट पसरली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यापेक्षा फडणवीस आणि महाजन मोठे नेते आहेत, अशी खोचक टीका नाथाभाऊंनी केली आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी 15 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्यसेवा करण्यात आली.