पक्षात किंवा महायुतीत मंत्रिपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. कारण नसतांना माध्यमे काहीवेळा अशा अफवा पसरतात. - अजित पवार
छगन भुजबळ : महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष आहे हे मान्य आहेत. ते बिग ब्रदर आहेत. पण आमचेही चाळीस आमदार आहेत. शिंदें एेवढ्या जागा आम्हा हव्यात.
अजित पवार गटाचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या मेळाव्यात बोलतांना अजित पवारांनी शरद पवारांविषयी (Sharad Pawar) कृतज्ञता व्यक्त केली.
छगन भुजबळः मुस्लिम, दलित समजाबरोबर आदिवासी समाज हे आपल्याला सोडून गेले आहेत. आजार ओळखून औषध दिले तर यश आपले आहे.
आम्ही दिल्लीत कोणतीच लाचारी पत्करली नाही, आणि पत्करण्याचा प्रश्नच येत नाही, असं अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
20 वर्षापूर्वी राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाची संधी घेतली असती त पक्षाल वळून पाहण्याची गरज पडली नसती, असं विधान सुनील तटकरेंनी (केलं.
सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा २५वा वर्धापनदिनाच्या अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या. तसंच, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं चितन करणार असंही म्हणाले.
भाजपकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता, मी पूर्वी भारत सरकारमध्ये मंत्री होतो. त्यामुळे स्वतंत्र प्रभार पदभार घेणं मला योग्य वाटत नव्हतं
मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मोहोळ यांना मंत्रीपद मिळणे ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.