अहमदनगर : काॅंग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर ते काय भूमिका घेणार, याची उत्सुकता असतानाच त्यांनी काॅंग्रेस मधील मित्रांना शुभेच्छा देत आपले जुने दोर कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे काॅंग्रेसमधील मित्र, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत बंडानंतरचे आपले पहिले ट्विट केले आहे. अर्थात या ट्विटवर तांबेना अनेकांनी ट्रोल केले आहे. काही […]
मुंबई : ‘मला एसीबीची नोटीस आली हे आपेक्षितच आहे. तशी मानसिकता सुद्धा आम्ही केली आहे. पण जो तक्रारदार आहे तो अकोल्यातला एक गुन्हेगार आहे. त्या व्यक्तीचं आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या संभाषणाची क्लिप त्या दिवशी मी व्हायरल करेल. असा इशारा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. […]
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं.
पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युतीवर मुंबईत घोषणा झाली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत घेत घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरु आहे. त्यापूर्वीच ह्या दोन्ही गटाची युती झाली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित […]
पुणे : मी जे बोललोयं ते चुकीचं असल्याचं पटवून द्या, राजकारण सोडून देणार असल्याचं चॅलेंज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांना दिलंय. मला भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेते पद दिलेलं नसून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी दिल्याचं रोखठोक प्रत्युत्तरही त्यांनी दिलंय. ते पुण्यात आज पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मी कोणत्याही महापुरुषांबद्दल कधीच वादग्रस्त वक्तव्य […]
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर ऐवजी स्वराज्यरक्षक’ म्हणावं असं विधान केलं होतं. यानंतर भाजपने त्यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन केलं. या विषयावर लेट्सअप मराठीचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्याशी संवाद साधला.