अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला शिवसेना पक्ष (Shivsena) व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना चोर म्हटले आहे. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही धनुष्यबाण काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता. तो मी सोडविला आहे. तुम्ही […]
मुंबईः शिवसेना (Shivsena पक्ष व धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) गटाला मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हा लोकशाही आणि बहुमताचा, सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरेंवर मात्र त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली नाही. यावर मी बोलणार नाही, असे शिंदे म्हणाले. […]
अहमदनगरः केडगाव हे नगर शहरातील उपनगर. पण गेल्या अनेक वर्षांपासून ते राज्याला माहित आहे. कारण म्हणजे तेथील राजकारण, त्यातून होणारे गुन्हे आणि वर्चस्ववाद होय. पाच वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीतील वादातून येथेच दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या झाली होती. हे हत्याकांड राज्यभर गाजले. त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या केडगावमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली […]
हवामान बदलाचा फटका (climate change) कापसासारख्या नगदी पिकाला बसतोय. भारत–पाकिस्तानसह (India-Pakistan) भारतीय उपखंडातले वास्तव विदारक आहे. उत्पादनापासून निर्यातीपर्यंत शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी कापूस लागवडही (cotton) धोक्यात आली आहे. अमेरिकेतील ईस्ट–वेस्ट सेंटरने नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वर्कशॉपमध्ये याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार व फोकस इंडियाचे सहसंपादक सकृत […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) हे वयाच्या 83 व्या वर्षी ही पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर प्रवास करत असतात. गेल्या चार दिवसांत एखाद्या तरुण नेत्याला लाजवेल असा भरगच्च कार्यक्रम शरद पवार यांनी घेतले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अधिवेशनानंतर पवार यांनी मुंबई, नागपूर, नाशिक, वर्धा असा प्रवास केला आहे. ते ही चार दिवसांमध्ये, […]
बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मागील महिन्यात कार अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबईत उपचार झाल्यानंतर तब्बल चाळीस दिवसानंतर ते आज परळीत (Parli) दाखल झाले आहेत. मुंडेंच्या समर्थकांनी त्यांचे जोरदारपणे स्वागत केले आहे. गहिनीनाथ गडावर वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांचे घराच्यांनी जोरदारपणे स्वागत केले आहे. परळीत आल्यानंतर त्यांनी प्रथम […]
औरंगाबादः पैठणमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी घेरले होते. भुमरे यांचे दारूची दुकाने आहेत. ग्राहक येण्यासाठी दारूच्या दुकानासमोर स्पीड ब्रेकर कसे टाकले, यावरून पवारांनी भुमरेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्याला आता रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्याच्या घरी […]
अहमदनगरः जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला (Medical Officer) लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी -कोरडे असे तिचे नाव आहे. आपल्या सहकाऱ्याकडे दहा हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB)अधिकाऱ्यांनी तिला आज रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील तक्रारदार या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. त्यांचा ऑगस्ट, सप्टेंबर […]
मुंबईः नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyjeet Tambe) यांनी आज विधानभवनात आमदार म्हणून शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर मात्र माध्यमांशी संवाद साधताना सत्यजीत तांबे यांनी नगर जिल्ह्यातील एक अदृश्य शक्तीची मदत मात्र नाकारली आहे. ज्ञात-अज्ञात सर्वांची निवडणुकीत मदत झाल्याचे तांबे यांनी सांगितले आहे. नगर जिल्ह्यातील राजकारणात मातब्बर असलेल्या विखे (Vikhe) कुटुंबियांकडे […]
मुंबईः विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनात पार पडला. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी घेतलेली शपथ मात्र अनोखी ठरली आहे. इतर सदस्य आपले वरिष्ठ नेते आणि श्रेष्ठींची नावे घेत असताना आमदार सत्यजीत तांबे यांनी सुरवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज व फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांची नावे […]