राजधानी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव घडले. शनिवारी रात्री उशिरा येथील हॉस्पिटलला भीषण आग लागली.
श्रीलंका टीमचा माजी फलंदाज कुमार संगकाराने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर. 27 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार.
नवीन पटनायक राजकारणात येण्याआधी उत्तम लिखाण करत होते त्यांचा पेहरावही जीन्स पँट आणि टी शर्ट असाच असायचा. पण राजकारणात आले आणि खादीधारी बनले.
यंदा लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा विजयी होईल असा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे.
चीनने मालदीवला दीड हजार टन पाण्याची दुसरी खेप रवाना केली आहे. दोन महिन्यांच्या आत ही दुसरी मदत चीनने मालदीवला केली आहे.
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी नगर पोलिसांना आदेश द्यावेत अशी मागणी सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आज पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे.
अमित शहांनी आम्हाला राज्यपाल पदाचा शब्द दिलाय त्यामुळे दरेकरांनी विनाकारण बोलू नये, असे आनंदराव अडसूळ म्हणाले.
सन 2024 साठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स जारी केला आहे. या यादीत पर्यटनासाठी प्रसिद्ध दहा देशांची नावे दिली आहेत.