Wadhawan brothers : देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान (Kapil Wadhwan) आणि धीरज वाधवान (Dheeraj Wadhwan) सध्या तळोजा कारागृहात आहेत. मात्र याच कारागृहात त्यांना अलिशान सोयी-सुविधा मिळत असल्याचे समोर आले आहे. मेडिकल टेस्ट आणि ट्रिटमेंटच्या नावाखाली हे दोघेही कारागृहातून बाहेर येतात आणि केईएम रुग्णालय, जेजे रुग्णालयांच्या पार्किंग लॉटमध्ये सर्व सुखसोयी उपभोगत असल्याचे […]
Shinde Government : मुंबई : महाराष्ट्र सरकारने भाजपचे माजी खासदार आणि आणि पंजाबचे विद्यमान राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) यांच्या मुलाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला जमिनीच्या शुल्कापोटी आकारण्यात येणारे 13.58 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर हे 13.58 कोटी माफ करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियम बदलण्यात आले आहेत. महसूल आणि अर्थ विभागाने […]
पुणे : पार्थ पवार यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुसरा मुलगा जय पवारही राजकारणात येण्यासाठी सज्ज झाले आहेत. “तुम्ही दादांशी बोलून घ्या, तिकडून ग्रीन सिग्नल आला की मी लगेच तयार आहे”, असे म्हणत त्यांनी राजकीय एन्ट्रीचे संकेत दिले. ते आज (29 ऑगस्ट) बारामतीमध्ये शहर कार्यालयात आले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (DCM Ajit Pawar’s […]
नवी दिल्ली : अमेठी, बारामतीसह 2014 आणि 2019 मध्ये न जिंकता आलेले 160 मतदारसंघ येत्या लोकसभा निवडणुकीत जिंकणारच असा चंग भाजपने बांधला आहे. या 160 जागांसाठी भाजपने खास प्लॅन बनविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारांना या जागांवर निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून भाजप इथले उमेदवार वेळेपूर्वीच जाहीर करणार आहे. स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा […]
मुंबई :आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असून त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीची ब्ल्यू प्रिंटही तयार करण्यात आली आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला 1 सप्टेंबर […]
पुणे : पालकमंत्र्यांच्या आशीर्वादानं कसब्याचा 10 कोटींचा निधी पर्वतीला वळविण्यात आला आहे. त्यामुले कसब्यातील 100 विकासाची कामं खोळंबली आहेत. आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) जिथं दिसतील तिथं आंदोलन करणार असा इशारा कसब्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. धंगेकरांच्या या आरोपांमुळे आता पुण्यातील राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. […]
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात ऐशोआरामासाठी सर्वच सोयी-सुविधा पुरविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या बॅरेकमध्ये बेड, पंखा, कुलर अशा सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. शिवाय देशी चिकन आणि तुपातील मटण दिले जात असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयालाही याबाबत कल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे इम्रान […]
अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी वसूल केल्याच्या आरोपात निलंबित झालेल्या आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना पुन्हा एकदा सेवेत घेण्यात आले असून त्यांना पदस्थापनाही देण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने नियमांचा हवाला देत त्रिपाठी यांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस केली होती. त्यानंतर 29 जून रोजी त्यांचे निलंबन […]
पुणे : जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 10 पैकी 6 आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाजूने आपला कौल दिला आहे. तर अशोक पवार यांनी शरद पवार यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ हडपसरचे चेतन तुपे आणि जुन्नरचे अतुल बेनके हे अद्याप तळ्यात मळ्यात आहेत. बेनकेंची भूमिका स्पष्ट नसली तरी काही दिवसांपासूनच्या त्यांच्या हालचाली पाहता ते अजितदादांच्या गटात […]
भारताचे चांद्रयान 3 मिशन यशस्वी झाल्यानंतर आता सुर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम आखण्यात आली असून याच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. पहिले स्पेस बेस्ड इंडियन ऑब्जर्वेटरीशी संबंधित भारताचे सूर्य मिशन Aditya-L One 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केले जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी (28 ऑगस्ट) रोजी याबाबत ही माहिती दिली. ISRO ने दिलेल्या माहितीनुसार, […]