पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना संवदेनशील मनाचे राजकारणी म्हणून ओळखले जाते. याचा प्रत्यत अनेकदा त्यांच्या जाहीर भाषणांमधून, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या खासगीत झालेल्या भेटीतील फोटोंमधून येत असतो. कधी ते कर्णबधिर मुलांमध्ये रमतात, तर कधी ते पदाधिकाऱ्याची पाट दुखत आहे, हे ऐकताच तेलाची वाटी घेऊन थेट त्याच्या पाठीला मालीश करुन देतात. राज ठाकरे यांचे […]
सांगली : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना आहेत. पाटील यांनी मात्र वेळोवेळी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. अशात आता सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांनी जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचा दावा करत या चर्चांना पुन्हा एकदा हवा दिली आहे. ते मिरज येथील एका कार्यक्रमात बोलत […]
मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंड करणाऱ्या खासगी लष्कर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवेजनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांचा काल (23 ऑगस्ट) एका विमान अपघातात मृत्यू झाला. प्रिगोझिन यांच्यासोबत विमानातील दहा जण ठार झाल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे. प्रिगोझिन यांच्या मृत्यूनंतर जगभरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या असल्याचा दावा जगभरातून केला जात आहेत. […]
नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून वादात अडकलेल्या भारतीय कुस्तीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. कुस्ती महासंघाची निवडणूक न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. (The United World Wrestling has indefinitely suspended the membership of the Wrestling Federation of India) दरम्यान, यानंतर […]
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. आज (24 ऑगस्ट) रोजी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 81 व्या वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. 1957 च्या ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी व हिंदी […]
बीड : जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पर्याय सापडला आहे. संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ आणि बीड नगरपालिकेचे माजी सदस्य डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आज (23 ऑगस्ट) राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी अजित […]
Chandrayaan-3 : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्त्रोच्या चांद्रयान -3 चे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं आहे. आज (दि. 23) संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने दिली आहे. या सॉफ्ट लँडिंगने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. आता पुढील चार तासांनंतर […]
मागील काही दिवसांपूर्वी एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण चर्चेत होतं. अधिकारी होताच पत्नीनं शिपाई असलेल्या पतीचा विश्वासघात केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. त्यानंतर अनेक पतींनी त्यांच्या पत्नीचे काम आणि अभ्यास बंद केला. क्लास बंद केले. आपलीही पत्नी पुढे जाऊन असाच विश्वासघात करेल आणि साथ सोडेल अशी भीती अनेकांच्या मनात बसली. दरम्यान, आता आणखी एक […]
2007 मध्ये बीग बी अमिताभ बच्चन यांचा श्रीसिद्धिविनायकाला बोललेला एक नवस पूर्ण झाला. आता नवस काय होता, हे तर सांगता येणार नाही, पण नवस फेडण्यासाठी त्यांनी गणपतीचे वाहन असलेल्या उंदराची साडे तीन किलोची मुर्ती सिद्धिविनायक मंदिराला देणार होते. आता अमिताभ बच्चन राहतात मुंबईत, श्रीसिद्धिविनायक मंदीर मुंबईत, त्यामुळे त्यांनी ही मूर्ती मुंबईतच बनवून घेणे अपेक्षित होते. […]
नवी दिल्ली : ईडी आणि सीबीआय या केंद्र सरकारच्या दोन्ही बहुचर्चित तपास यंत्रणा आता एकाच छताखाली येणार आहेत. लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये समन्वयासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे पद निर्माण करण्यात आलं आहे. त्याच धर्तीवर आता मोदी सरकार सीबीआय आणि ईडीमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘चीफ इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर’ या पदाची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे […]