मुंबई : भाजपसोडून राष्ट्रवादीशी घरोबा केलेल्या अन् आमदार झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी परत पक्षात यावं असं म्हणतं भाजपचे (BJP) नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीत विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी खडसेंना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. मुंबई तकने आयोजित केलेल्या विशेष मुलाखतीमध्ये तावडे बोलत होते. भाजपाचे काही दुखावलेले, नाराज झालेले नेते वैयक्तितरित्या तुमच्याशी बोलतात का? […]
बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले होते. कारखान्याचं आणि शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असून यातून चांगला पायंडा पडेल, असा विश्वास यावेळी पंकजा मुंडे […]
राज्य सरकारने शुक्रवारी 20 भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या केल्या. यात महिन्याभरापूर्वीच पोस्टिंग मिळालेले अधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात कृषी आणि पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून मुंडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यांनी पदभारच स्वीकारला नव्हता. आता तेथून पुन्हा महिन्याभरात त्यांची बदली झाली आहे. मुंडे यांची बदली आता मराठी […]
Shivrajyabhishek Din : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आज (शुक्रवार) 350 वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), छत्रपती उदयनराजे भोसले, रायगडचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह मंत्री दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर प्रत्यक्षात […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक काम करत आहेत, याची खात्री पटल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली, असं म्हणतं मंत्री उदय सामंत यांनी शिंदे-पवार भेटीवर प्रतिक्रिया दिली. ते रायगड येथे बोलत होते. काल (गुरुवार) शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जावून भेट घेतली. राज्यातील सत्तातरानंतर पहिल्यांदाच पवार यांनी शिंदे […]
रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळादिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड किल्ल्यावरुन मोठी घोषणा केली. राज्य शासनाकडून रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाच्या धर्तीवर प्रतापगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज […]
Lok Sabha Election 2023 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या आणि प्रमुख नेत्यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढविण्यासाठी असमर्थता दर्शविली असल्याची माहिती आहे. १८ लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीमध्ये एकाही बड्या नेत्याने लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात जिल्हाध्यक्षांनी इच्छुकांची नाव कळवावी, असा निर्णय झाला असल्याची माहिती आहे. मात्र यामुळे आगामी काळात […]
अहमदनगर : नुकतचं बहुप्रतिक्षित निळवंडे धरणातून पाणी वाहिलं. म्हणजे काय झालं तर तब्बल 5 दशकांपासून काम सुरु असलेल्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते ही चाचणी झाली. पण “आता सध्या फक्त चाचणी झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान […]
माढा : एकेकाळी बालेकिल्ला अन् शरद पवार यांचा मतदारसंघ असलेला माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. नुकतीच मुंबईत या मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. यात मतदारसंघातील पक्षाची ताकद, कमी असलेल्या ठिकाणी करायच्या उपाययोजना, मतांची गणिती अशा विविध गोष्टींचा आढावा घेण्यात आला. याशिवाय फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर […]
दिल्ली : “मी भाजपची आहे पण, भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. राष्ट्रीय समाज पक्ष माझं माहेर आहे. माझ्या भावाचं घर आहे. वडिलांशी लढाई झाली तर भावाच्या घरीही जाऊ शकते” असं सुचक वक्तव्य करत भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाजपला इशारा दिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दिल्लीत […]