पुणे : “पाच वर्ष त्यांच्या मतदार संघात लक्ष दिले असते. पण आता निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे यांना उत्साह आला आहे. त्यातून कोणाला संघर्ष यात्रा सुचत आहे तर कोणाला पदयात्रा सुचत आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर टीका केली. […]
दौंड : लग्न जमत नसलेल्या मुलाशी लग्न करुन त्याला आर्थिक गंडा घालणाऱ्या तोतया नवरीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. देलवडी (ता. दौंड) येथे हा प्रकार घडला आहे. तर अन्य चार आरोपींचा शोध सुरु आहे. आशा निकम, ज्योती लोखंडे, मेधा सोळंखी, आकाश कोटे आणि चित्रा अंभोरे (तोतया नवरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दौंड […]
कभी-कभी खूबसूरत खयाल खूबसूरत बदन भी अख़्तियार कर लेते हैं। असे म्हणत आपल्या निस्वार्थ प्रेमाने प्रेयसी अमृता प्रीतमला साद घालणाऱ्या इमरोजचे निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम (Amrita Pritam) यांच्या निस्वार्थ प्रेमकथेतील नायक, प्रसिद्ध चित्रकार आणि कवी म्हणून इमरोज (Imroj) यांना ओळखले जात होते. मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी […]
एकनाथ शिंदेंचे बंड झाले. त्यांच्यासोबत कोकणातील नऊ आमदार होते. कोकण हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला समजला जातो. मात्र तिथूनही शिंदेंना एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांनी साथ दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) असलेली आघाडी आपल्या मतदारसंघात आपल्याच मुळावर येईल, अशी भीती या आमदारांना असल्याने हे आमदार शिंदेंसोबत गेल्याचे स्पष्ट झाले होते. […]
नागपूर : काँग्रेस नेते, आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायलयाने जिल्हा बँकेतील 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केदार यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले आहे. 2002 मध्ये केदार बँकेचे अध्यक्ष असताना 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन तपास […]
पुरी : येथील श्री. जगन्नाथ मंदिरात बीफ खाऊन प्रवेश केल्याचा आरोप करत सुप्रसिद्ध यूट्यूबर कामिया जानी (Kamiya Jani) आणि बिजू जनता दलाचे नेते व्हीके पांडियन यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी ओडिसा भाजपने केली आहे. समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात दोघांवरही आयपीसी कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दोघांनाही तात्काळ अटक केली जावी. […]
मुंबई : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते आणि कर्जत-खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड (Suresh Lad) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांच्या पक्षप्रवेशाचाा कार्यक्रम पार पडला. शरद पवार गटाच्या मर्यादा आणि अजित पवार गटाचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे मतदारसंघात वाढलेले प्रस्थ यामुळे ते […]
नवी दिल्ली : सामाजिक समरसता आणि एकात्मता खंडित होऊ नये, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) भूमिका आहे. त्याला अनुसरुन जातनिहाय जनगणनेसारख्या कार्यक्रमांचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हायला हवा, असे मत संघाचे अखिल भारतीय प्रचार व प्रसार प्रमुख सुनील आंबेकर (Sunil Ambekar) यांनी व्यक्त केले. त्यांनी दिल्लीतून निवेदन प्रसिद्ध करून संघाचा जातनिहाय जनगणनेला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. […]
पुंछ : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये लष्कराचे जवान घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. PTI वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. याच पाच जवान शहीद झाले आहेत. (Terrorists fire at Army vehicle carrying jawans in Jammu and Kashmir’s Poonch district) Terrorists fire at Army vehicle […]
छत्रपती संभाजीनगर : वंजारी समाजाने विवाह जुळवताना अडचणीची ठरणारी ‘वाढीभाऊ’ तथा ‘वाढेभाऊ’ ही कालबाह्य पद्धत रद्द करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुले आता फक्त जवळचे नातेगोते वगळून 60 आडनावांमध्ये विवाह ठरविता येणार आहेत. पाथर्डीमध्ये येत्या 24 डिसेंबरला वंजारी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे समाजातील ज्येष्ठ […]