नवी दिल्ली : “संसदेच्या आवारात आदरणीय उपराष्ट्रपती यांचा ज्या प्रकारे अपमान झाला ते पाहून मी निराश झाले आहे”, असे म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या व्यंगाची नक्कल करणाऱ्या खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee’ )यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. बॅनर्जी यांनी संसद भवनाबाहेर निदर्शने करत असताना जगदीप धनखड (Jandeep Dhankhad) यांची […]
Sandeep Maheshwari vs Vivek Bindra : मुंबई : यूट्यूब कम्युनिटीमधील दोन दिग्गजांमध्ये सध्या मोठा वाद सुरु आहे. सुप्रसिद्ध यूट्यूबर, मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी (Sandeep Maheshwari) आणि मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा (Vivek Bindra) हे दोघेही ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’च्या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत. माहेश्वरी यांनी सहा दिवसांपूर्वी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवरुन या वादाची […]
कितीही मोठा सेलिब्रिटी असो, बिल्डर असो, माफिया असो की गँगस्टर असो. 90 च्या दशकात खैरनार यांना जर अनधिकृत बांधकाम दिसले तर त्यांचा हमखास हातोडा पडणार याची गॅरंटी मुंबईकरांना होती. आज पाकिस्तानमध्ये जाऊन स्थिरावलेला दाऊद इब्राहिमही मुंबईतून पळून जाण्याचे एक कारण गोविंद राघो खैरनार अर्थात गो. रा. खैरनार हे देखील एक होते. खैरनार यांची दुसरी ओळख […]
मंडी : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वडील अमरदीप यांनी ती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पहिल्यांदाच अधिकृतपणे दुजोरा दिला. मात्र, ती कोठून निवडणूक लढवणार याचा निर्णय भाजप घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Bollywood actress Kangana Ranaut will contest the upcoming Lok Sabha elections.) दोन […]
नागपूर : भाजप आणि शिवसेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी आज (19 डिसेंबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘रेशीमबाग’ येथील स्मृतीमंदिरात हजेरी लावली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक आणि पहिले सरसंघचालक दिवंगत केशव बळीराम हेडगेवार (Keshav Baliram Hedgewar) यांना अभिवादनही केले. यावेळी भाजपच्या आणि सेनेच्या आमदारांना संघाकडून आगामी निवडणुका आणि दोन वर्षांत होणारी संघाची शताब्दी या विषयांवर पाच मुद्द्यात […]
नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांनी आज (19 डिसेंबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘रेशीमबाग’ येथील स्मृतीमंदिराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. आपल्या पूर्वनियोजत कार्यक्रमांमुळे येऊ शकणार नसल्याचे अजितदादा आणि त्यांच्या गटातील आमदारांनी कालच कळविले होते. पण यामागे मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि टीका होऊ शकते ही शक्यता लक्षात घेत पाठ फिरविली असल्याचे बोलले […]
नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी आम्हाला कोणीही पाठिंबा दिला तरी त्याचे स्वागतच आहे. मग तो अजितदादांनी देऊ दे, भाजपने देऊ दे, मोदी साहेबांनी देऊ दे किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी देऊ दे. आमची फक्त एकच अट आहे की, आम्हाला आमच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadeo Jankar) […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : नागपूर : सत्तेत येऊन दीड वर्षे झाली. पण अद्याप ना मंत्रिमंडळ विस्तार झाला ना आयोग आणि ना महामंडळांवरील नियुक्त्या झाल्या. आता लोकसभा निवडणुका अगदीच तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा होईल, त्यापूर्वी महामंडळ अन् आयोगांवरील नियुक्त्या तरी मार्गी लावा, अशी मागणी करत शिवसेना प्रतोद भारत गोगावले यांच्या नेतृत्वात […]
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेवरुन हिवाळी अधिवेशनात सुरु असलेला गदारोळ सोमवारीही (18 डिसेंबर) दोन्ही सभागृहात कायम राहिला. याच गदारोळातून एका दिवसात तब्बल 78 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यात लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 अशा खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. (92 MPs suspended in four days in Parliament winter session) 45 खासदारांपैकी 34 खासदारांना हिवाळी […]
मुंबई : राज्यभरातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीने त्यांचा दुसरा आणि अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला. या अहवालानुसार राज्यभरातील मराठा समाजातील 54 लाख नागरिकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र […]