उज्जैन : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर डॉ. मोहन यादव (Mohan Yadav) शनिवारी (16 डिसेंबर) पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात उज्जैनला गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी मुक्कामही केला. या दौऱ्यात त्यांनी विकास भारत संकल्प यात्रेला सुरुवात केली, त्यानंतर सात किलोमीटर लांबीचा रोड शोही केला. याशिवाय येत्या 14 जानेवारीला मंत्रिमंडळाची पहिली बैठक उज्जैनमध्ये होणार असल्याचे […]
सुरत : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी गुजरातला (Gujrat) दोन सर्वात मोठे गिफ्ट मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते आज (17 डिसेंबर) आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी जगातील सर्वात मोठ्या ‘सुरत डायमंड बोर्सचे’ उद्घाटन करण्यात आले. याशिवाय सुरत विमानतळावर (Surat international airport) एका नवीन एकात्मिक टर्मिनलच्या इमारतीचेही उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे वर्षभरात तब्बल 55 […]
मुंबई : उद्योगपती आणि जेएसडब्ल्यू ग्रुपचे (JSW Group) व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल (Sajjan Jindal) यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईतील बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जानेवारी 2022 मध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जेएसडब्ल्यू कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या वर असलेल्या पेंटहाऊसमध्ये हा प्रकार घडला असल्याचा दावा या अभिनेत्रीने तक्रारीत दाखल केला आहे. […]
नागपूर : बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाल्याची बातमी येत आहे. या स्फोटात नऊ जण ठार झाले असून काही जण गंभीर जखमीही झाले आहेत. कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी ही घटना घडली असल्याचे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली. ANI ने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Nine people were killed […]
जयपूर : भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेताच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानमध्ये संघटित गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठीअँटी गँगस्टर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय बहुचर्चित पेपरफुटी प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आणि आगामी परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी तत्काळ प्रभावाने एसआयटीही स्थापना करण्यत आली आहे. (formation of […]
पुणे : पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील केकवर लावायच्या शोभेच्या फटाक्याच्या (स्पार्कल कँडल) मेणबत्ती कंपनीतील स्फोटातील मृतांची संख्या 11 झाली आहे. तर पाच जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्य शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणातील सर्व दोषींविरोधात कारवाईचा फास आवळला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच रेड झोनच्या हद्दीबाबतही […]
नवी दिल्ली : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची पोटनिवडणूक तातडीने घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र या आदेशाविरोधात आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. पण अपील कालवधी 60 दिवसांचा असल्याने पोटनिवडणूक तुर्तास तरी होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुणे […]
देशातील कांद्याची उपलब्धता आणि किंमत नियंत्रित करण्यासाठी मोदी सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे तर त्याचवेळी सामान्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. पण भारताच्या (India) याच निर्णयाचा परिणाम शेजारी देशांवरही झाला आहे. भारताने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर शेजारील बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि […]
नागपूर : धर्म बदलून दुहेरी फायदा घेणाऱ्या महाराष्ट्रातील आदिवासींवर आता राज्य सरकारकडून (Shinde Government) कारवाई करणार आहे. यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे. ही समिती जे आदिवासी अल्पसंख्याक आणि अनुसूचित जमाती या दोन्ही वर्गांचा धर्म बदलून फायदा घेत आहेत, त्यांचा अभ्यास करेल आणि त्याचा अहवाल सरकारला सादर करेल, अशी मोठी घोषणा मंत्री मंगल प्रभात […]
सोनभद्र : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील एक भाजपचे (BJP) आमदार दोषी आढळले असून त्यांना तब्बल 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. रामदुलार गोंड असे त्यांचे नाव असून ते दुधी विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. याशिवाय न्यायालयाने त्यांना 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. सोनभद्र येथील लोकप्रतिनिधी न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयाने 12 डिसेंबर […]