Ram Mandir : लालकृष्ण आडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित नसणार, काय आहे कारण?

  • Written By: Published:
Ram Mandir : लालकृष्ण आडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित नसणार, काय आहे कारण?

Ram Mandir Pran Pratishtha : आज अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिरा (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. या सोहळ्यासाठी राजकीय नेते, कलाकार आणि खेळाडू यांना निमंत्रित केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी (Lalkrushna Advani)यांनाही निमंत्रण देण्यात आलं. आलं. मात्र, ते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे.

Sonali Bendre : ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट ड्रेसमध्ये सोनाली बेंद्रे, ग्लॅमरस लुक्सवर चाहते फिदा! 

लालकृष्ण आडवाणी हे रामजन्मभूमी आंदोलनाचा प्रमुख चेहरा आहेत. 90 च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाने देशभरात जोर पकडला, त्यावेळी अडवाणींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आज तेच आडवाणी रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. थंडी आणि खराब हवामानामुळे त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. अडवाणी आता 96 वर्षांचे असून त्यांची प्रकृती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ते दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी या भव्य सोहळ्याचा आनंद घेणार आहेत.

Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर; अयोध्येसह संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण 

आरएसएसने दिलं होतं निमंत्रण
राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार यांनी लालकृष्ण आडवाणींना त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण दिले होते. यावेळी आडवाणी म्हणाले, एवढ्या मोठ्या सोहळ्याला प्रत्यक्षपणे सहभागी होण्याची संधी मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. कारण, श्री रामाचे मंदिर हा आराध्य दैवत म्हणून प्राणप्रतिष्ठा करणं नाही. तर तर या देशाची पवित्रता आणि या देशाच्या मर्यादेची स्थापना होण्याचा हा प्रसंग आहे.

आडवाणी म्हणाले होते, एक म्हणजे इतक्या वर्षांनंतर आपण भारताची ‘स्व’ च्या प्रतिमेचे पुननिर्माण केले. आम्ही हे पुरुषत्वाच्या आधारावर केले. दुसरे, आपल्याकडे एक दिशा असली पाहिजे, जी आपण अनेक दशकांपासून शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. ती आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे वातावरण मंगलमय झाले असून अशा वेळी आपण स्वतः तेथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचे साक्षीदार होऊ. हे निश्चितच एखाद्याच्या जन्माचे पुण्य असेल. त्याचेच फळ आम्हाला मिळत आहे.  यासाठी मी तुमचा खूप कृतज्ञपणे आभार मानतो, असंही आडवाणी म्हणाले होते.

कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलेल्या जवळपास सर्वच विरोधी नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला असून काँग्रेसने हा भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube