रामटेकमध्ये वंचितच्या उमेदवाराची माघार, आंबेडकरांचा किशोर गजभियेंना पाठिंबा

रामटेकमध्ये वंचितच्या उमेदवाराची माघार, आंबेडकरांचा किशोर गजभियेंना पाठिंबा

VBA support Kishor Gajbhiye : रामटेक लोकसभा मतदारसंघात (Ramtek Lok Sabha Constituency) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज (दि. 3 मार्च) बुधवारी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये (Kishor Gajbhiye) यांना पाठिंबा जाहीर केला. वंचितचे अधिकृत उमेदवार शंकर चहांदे (Shankar Chahande) यांनी कौटुंबिक कारणांमुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर वंचितने किशोर गजभियेंना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Pune Loksabha : ‘माझा विश्वास मतांच्या विभाजनावर नाही तर पुणेकरांवर’; धंगेकरांना भलताच कॉन्फिडन्स 

रामटेक लोकसभेसाठी वंचितकडून शंकर चहांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं. चहांदे यांनी कौटुंबिक कारणामुळे निवडणूक लढविण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे आम्ही किशोर गजभिये यांना पाठिंबा दिल्याची घोषणा वंचितचे उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्यामुळं रामटेकमध्ये आता महायुतीचे उमदेवार राजू पारवे, महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे आणि वंचितने पाठिंबा दिलेले किशोर गजभिये यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

काँग्रेसने माझ्यावर जास्त ऊर्जा खर्च करू नये, तसंही पक्ष आर्थिक संकटात; संजय निरुपमांचा घरचा आहेर 

किशोर गजभिये हे कॉंग्रेसच्या तिकीटासाठी आग्रही होते. पण, पक्षाने त्यांना संधी न देता रश्मी बर्वे यांना संधी दिली. मात्र, रश्मी बर्वेचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं. त्यानंतर तरी आपल्याला उमेदवारी मिळेल, असं गजभियेंना वाटलं. पण कॉंग्रेसने श्यामकुमार बर्वे यांना उमदेवारी दिली. त्यामुळं गजभिये बंडाच्या तयारीत होते. म्हणून ‘वंचित’ने सुरूवातीला किशोर गजभिये यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी न देता चहांदे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते.

वंचित आणि कॉंग्रेसनेही तिकीट न दिल्यानं गजभियेंनी दोनच दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. ते उमेदवारी मागे घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. दरम्यान, आता वंचितने त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक मतदारसंघात वंचितांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज