राज्यात आज ‘जोर’धार! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; वाचा, हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain Update : राज्याच्या अनेक भागात पाऊस कोसळत आहे. गणरायाच्या आगमनापासूनच (Ganesh Festival) पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी या पावसामुळे शेती पिकांचे नुकसानही झाले आहे. तरी देखील पावसाचा (Maharashtra Rain Update) जोर कमी झालेला नाही. आजही राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून येथील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला (Rain Alert) आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे.
गणेशोत्सवात देखावे (Ganeshotsav 2024) पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे. याच काळात पावसाची शक्यता दिसून येत आहे. आज शनिवारी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे (Pune Rains) जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कुठे बरसणार, कुठे ब्रेक घेणार? ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज..
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उद्या रविवारी सुद्धा जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरात पाऊस होईल. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. पंजाबमधील अमृतसरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, आकाश अंशतः ढगाळ राहील.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २६°C च्या आसपास असेल.— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 13, 2024
देशभरात पावसाचा जोर कायम आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) तुफान पाऊस होत आहे. या दोन्ही राज्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहणार असून मध्य प्रदेश, छत्तीसगडसह 18 राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण छत्तीसगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, सिक्कीम, मध्य महाराष्ट्र, गुजरात या राज्यांनाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महायुतीला विदर्भात मोठा फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्व्हेने वाढवली डोकेदुखी
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं (Mumbai Rains) सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळला.