आज मुसळधार! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी, हवामानाचा अंदाज काय?
Maharashtra Rain : राज्यात लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. काल आगमनाच्या (Ganesh Festival) दिवशीच अनेक ठिकाणी पावसाने हजेरी (Maharashtra Rain) लावली होती. त्यानंतर आजही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy Rain) हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यांसह मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सावधान! येत्या 48 तासांत मुसळधार बरसणार; विदर्भ, मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
विदर्भातील अनेक जिल्ह्यांत आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाले आहे. त्यामुळे आज आणि उद्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता दिसून येत आहे. पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. 9 सप्टेंबरपर्यंत काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे. आता राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशाच्या अनेक भागात पावसाचे थैमान; हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्र्ता काय स्थिती?