मुंबई : आधीच पावसाला उशीरा झालेली सुरुवात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी आता सरकारी पातळीवरही तयारी सुरू झाली आहे. राज्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करुन कृषी, महसूल आणि इतर संबंधित विभागांनी आराखडा तयार ठेवावा, चारा, वैरण आणि पिण्याचे पाणी या अनुषंगाने […]
आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने् कंबर कसली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वीच भाजपने 39 जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. याशिवाय आता भाजपने इतर राज्यातील आमदारांना या निवडणुकीच्या कामासाठी मध्यप्रदेशात पाठविले आहे. भाजपने महाराष्ट्रातील आणि बिहारमधील आमदारांना मध्यप्रदेश […]
MLA Santosh Bangar video : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) सातत्याने वादात सापडत असतात. त्यांच्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा संतोष बांगर यांचा बस कंडक्टरवरुन हिंगोली (Hingoli) आगार प्रमुखाला दम भरतानाचा व्हिडिओ समोर आलाय. शालेय विद्यार्थींनी आणि विद्यार्थ्यांसोबत एक कंडक्टर नेहमी गैरव्यवहार करत होता. बस थांबवण्यावरुन घालून […]
मुंबई : शरद पवारांची बीडमधील सभा झाल्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांची 27 ऑगस्ट रोजी सभा होणार आहे. ही सभा रद्द झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री […]
Ratan Tata Udyogratn Puraskar : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata ) यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांच्या हस्ते हा पुरस्कार टाटा यांना त्यांच्या कुलाबा निवासस्थानी प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री […]
Beed News : राज्यात आता निवडणुकांचे वारे वेगाने वाहत आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. मतदारसंघांचीही चाचपणी सुरू आहे. तर दुसरीकडे इच्छुकांकडून तिकीटासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली जात आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेशही दिले आहेत. बीडमध्येही (Beed) राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. माजी आमदार बदामराव पंडित यांनी तर कार्यकर्त्यांना तंबीच देऊन टाकली […]