Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीची चर्चा अजूनही सुरुच आहे. या भेटीवर दोघांनीही प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी चर्चा काही थांबलेल्या नाहीत.आता तर खुद्द शरद पवारच सत्तेत सहभागी होणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्या (17 ऑगस्ट) शरद पवार यांची बीडमध्ये […]
अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात भाजप नेते विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं दिसून आलं आहे. कोपरगावातील रस्त्याच्या भूमिपूजन फलकाच्या वादावरुन दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार काळेंनी खांद्यावर घेतल्यानंतर आशुतोष काळेंनी थेट दंडच थोपटत विवेक कोल्हेंना ललकारल्याचं चित्र दिसून आलं आहे. यावेळी कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते. […]
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील पिपली बुरगी येथील बहुप्रतिक्षित क्रांतिवीर बाबूराव शेडमाके-कोठी कोरनार पुलाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय विविध विकास कामांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. फडणवीसांच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच शासन अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील पिपली बुरगी […]
लातूर : आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदासाठी अभिमन्यू पवार यांच्याशिवाय पक्षश्रेष्ठींसमोर दुसरे नावच नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही आमदार पवार यांच्यावर कृपा आहे, असे म्हणत भाजपचे माजी आमदार आणि कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी खळबळ उडवून दिली आहे. पटेल यांच्या या दाव्यानंतर आता माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर […]
Sambhaj Bhide News : वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांनी आज सांगलीत पदयात्रा काढली. भगव्या राष्ट्रध्वजाच्या मागणीसाठी आज स्वातंत्र्यदिनी त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ही पदयात्रा काढली होती. ऐन स्वातंत्र्यदिनीच ही पदयात्रा काढण्यात आल्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी असंख्य कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे […]
मुंबई : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाढत्या जवळकीतेमुळे महाविकास आघाडीत वेगळ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. ऐनवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास तयारी म्हणून काँग्रेसने ‘प्लॅन बी’वर काम सुरु केले आहे. याच प्लॅनचा भाग म्हणून काँग्रेस आता वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. हिंदुस्थान टाईम्सने एका […]