मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची नशा चढली. ते व त्यांचे चाळीस लोक त्याच धुंदीत आहेत, पण बुद्धीचे ‘गोपीचंद’ छाप पीक काढणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचे काय? त्यांना महाराष्ट्रातील हे अधःपतन दिसते की नाही? की ‘सब घोडे बारा टके’ या न्यायानेच सगळे चालले आहे? चालायचेच. चालू द्या. किती काळ चालवायचे ते पाहूच!” अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून आज सरकारवर करण्यात आली […]
गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद (Aurangabad) आणि धाराशिवचे नामांतर करण्याचा प्रश्न होता. अखेर केंद्र सरकारने औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे चे नामांतर ‘धाराशिव’ करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. […]
मुंबई : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) तर उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) नामकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. पण या नावावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्विटद्वारे सरकारला सवाल केला. दानवे यांच्या प्रश्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, औरंगाबादचे नाव […]
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी कांदा विकण्यासाठी 70 किमी दूर गेला, परंतु त्याचा 512 किलो कांदा केवळ 1 रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला. अशाप्रकारे, शेतकऱ्याला 512 रुपये मिळाले, ज्यामध्ये कांदा बाजारात नेण्यासाठी लागणारा खर्च वजा करून त्याला फक्त 2 रुपये मिळाले. शेतकऱ्याच्या कांद्याचा दर्जा निकृष्ट असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. शेतकरी 70 किमी दूर […]
मुंबई : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, हे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे खूप खूप आभार अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ व […]
मुंबई : सन १९८८ साली पहिल्यांदा शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) असे करावे अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेऊन मागणी केली होती. म्हणजे मागील ३३ वर्षांपासूनच्या लढ्याला आखेर यश आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली […]