दसरा मेळाव्याला राज अन् उद्धव ठाकरे एकत्र दिसणार का? राऊत म्हणाले, “आता दसऱ्याला..”

Raj Thackeray Sanjay raut

Sanjay Raut on Raj and Uddhav Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकीच्याा तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. आता दसरा मेळाव्यात दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सचिन अहिर यांनी एक वक्तव्य केल्यानंतर या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबक आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याची मुंबईच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे असे राऊत म्हणाले आहेत.

भविष्यात एकत्र काम करण्यावर सहमती : राऊत 

दसरा मेळाव्यात दोन्ही बंधू एकत्र (Uddhav Thackeray) येतील का याबाबत मला माहिती नाही. पण उद्धव आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांचा दुसरा मेळावा असतो. मराठी माणसांसाठीची आमची विचारसरणी एकच आहे. दोन्ही पक्ष वेगळे आहेत. दोन्ही पक्षांचे मेळावे वेगळे होतात. त्यामुळे तसं होणं शक्य नाही. भविष्यात काम करण्यासाठी एकत्र येण्यावर आमची सहमती झाली आहे असे संजय राऊत यांनी (Sanjay Raut) सांगितले.

“मुंबई लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही”, संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात

काय म्हणाले होते सचिन अहिर

सचिन अहिर यांनी दोन्ही बंधू दसरा मेळाव्याला एकत्र येण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे ही केवळ दोन पक्षांची गरज नाही तर राज्यासाठीही गरजेचे आहे. हीच लोकांच्या मनातील भावना आहे. आता गणेशोत्सवानंतर पितृपक्ष सुरू होणार आहे. त्यामुळे दसऱ्याला चांगली बातमी मिळेल. दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिशा द्यायची असते. त्यामुळे हा मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून महत्वाचा आहे असे सचिन अहिर म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube