भारतीय हवाई दलाने MiG-21 या लढाऊ विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. वारंवार विमान कोसळण्याच्या घटनांनंतर हवाई दलाने हा मोठा निर्णय घेतला आहे. नुकतेच राजस्थानमधील हनुमानगडमध्ये MiG-21 क्रॅश झाले. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. इंडिया टुडेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संपूर्ण MiG-21 ताफ्यावर बंदी घातली जाईल. 8 मे रोजी […]
दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदन पुन्हा एकदा कॅन्टीनच्या मुद्द्यावरून चर्चेत आले आहे. दोन कंत्राटदारांमध्ये झालेल्या वादात महाराष्ट्र सदन प्रशासनाने नवीन आणि जुन्या महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनचा गोंधळ संपता संपेना सदनातील दोन कंत्राटदाराचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाच्या एका निर्णयानंतर पद्मा आणि सुधीर रावत यांना एका रात्रीत 19 एप्रिल ला कॅन्टीन सोडावे लागले. तर येथे […]
Karnataka : कर्नाटकात काँग्रेसने (Karnataka) 136 जागा जिंकत सरकारही स्थापन केले आहे, सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. असे असले तरी काँग्रेसला कर्नाटक सर करण्यात मोलाचा वाटा उचलणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार नाखूश आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना एक खास आवाहन केलं आहे. शिवकुमार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 135 […]
Satish Jarkiholi took ministerial oath remembering Buddha, Basav, Ambedkar : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करुन धुव्वा उडवला. या विजयानंतर काल कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अनेक आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणारे सतीश जारकीहोळी […]
Mexico: अमेरिका गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. उत्तर मेक्सिकोतमधील बाजा कॅलिफोर्नियामध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये 10 जण ठार झाले आहेत. एन्सेनाडा शहरातील सॅन व्हिसेंट परिसरातील ऑल-टेरेन कार रेसिंग शोदरम्यान ही घटना घडली. हा परिसर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जातो. शेवगावातील दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, धर्माच्या नावावर.. एन्सेनाडा शहरातील सॅन व्हिसेंट भागात ऑल-टेरेन कार रेसिंग शो […]
Rahul Gandhi : 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. नवीन संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींनी केले पाहिजे, पंतप्रधानांनी नाही. वेळापत्रकानुसार पंतप्रधान मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल संसदेच्या नव्या इमारतीवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने याला पीएम मोदींचा वेनिटी प्रोजेक्ट […]