Sushma Andhare News : गृहमंत्री फडणवीस हे सध्या खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत, ते गृहखात्याला लागलेला कलंक आहेत, अशी जहरी टीका अंधारे यांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी नागपुरातील मेळाव्यात फडणवीसांवर केलेल्या टीकेवरुन राज्यात वादंग पेटलं आहे. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप-ठाकरे गटातील नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर आता सुषमा अंधारेंनीही फडणवीसांवर निशाणा साधला आहे. […]
Ashutosh Kale Vs Snehalata Kolhe : अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने अनेक मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. ज्यांच्याविरोधात निवडणुका लढल्यात त्यांच्याबरोबर जाणे अनेकांसाठी राजकीयदृष्ट्या धोक्याचे झाले आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे अजित पवार (Ajit Pawar) गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचे […]
Bachchu Kadu : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा (Cabinet expansion) आणि खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटेना. हाच तिढा सोडवण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या काही नेत्यांसोबत दिल्लीत दाखल झाले. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता प्रहार संघटेचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठं विधान केलं. राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा […]
NCP Crisis : मोठ्या राज्याचा सुभेदार होण्यापेक्षा लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला आहे. दरम्यान, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पाडून आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवारा गटामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु […]
शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या गोष्टीला आठवडा झाला तरी या मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आता दिल्लीत (Delhi)दाखल झाले आहेत. खातेवाटपाचा तिढा न सुटल्याने आता दिल्लीत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. अजित पवार हे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel), हसन मुश्रिफ […]
Rohit Pawar On Dilip Walse Patil : महाराष्ट्रात (Maharashtra) काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वांचं लक्ष राजकीय घडामोडींकडं लागलेलं आहे. त्यातच मंत्रिपदाची शपथ घेतलेले दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका सभेत रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. पवार डिंभे धरणातील पाणी कर्जतमध्ये नेणार असल्याचे म्हटले, त्यावर […]