ईडीला घाबरूनच भाजपसोबत पलायन; संजय राऊतांची भुजबळांवर टीका
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Sanjay Raut Allegations On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांना ईडीची (ED) भिती दाखवूनच तोडलं गेलंय. स्वत: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि त्यांचा पुतण्या तुरूंगात जावून आलेय. ईडीच्या भितीपोटी ते पक्ष सोडून गेले, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज केलंय. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ईडीतून सुटका म्हणजे पुनर्जन्म नाही. मी त्यातून गेलोय. माझ्यासारखे, अनिल देशमुख यांच्यासारखे लोक लढत आहोत आणि लढत राहू. परंतु झुकलो नाही, असंही राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
ईडीला घाबरूनच भाजपसोबत पलायन केलं असा गंभीर आरोप यावेळी संजय राऊत यांनी केलाय. ईडीची कारवाई थांबवण्यात आली की, थांबवली गेली? असा सवालही राऊतांनी केलाय. ईडीचा दबाव हेच पक्षफुटी मागचं कारण (Maharashtra Politics) होतं, असं राऊत म्हणालेत. अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावरही दबाव होता. रवींद्र वायकर यांच्यावर दबाव होता ते नाकारतील? असं देखील राऊतांनी सांगितलं.
धाराशिवच्या तरुणांसाठी आता जिल्ह्यातच रोजगार; राणाजगजितसिंह पाटलांनी दिली नव्या प्रकल्पांची माहिती
संजय राऊत म्हणाले की, याविषयी सविस्तर पत्र मी तत्कालीन उपराष्ट्रपतीना लिहिलं होतं. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असलेले फुटून गेले, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केलीय. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे शिवसेना धनुष्यबाणासह गहाण पडले. त्यामुळे त्यांनी धनुष्यबाणाविषयी बोलू नये. दुर्दैवाने राज ठाकरे हे पर प्रांतीयना यांना मदत करत आहेत. मोदी, शहा, अदानी या परप्रांतीयांना साफ करा, असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलंय. योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला बटेंगे कटेंगे शिकवतात? योगी आदित्यनाथ त्यांना चार भाऊ आहेत. गेल्या 40 वर्षात एकत्र येऊ शकले नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केलीय.
‘छठ पूजे’च्या कार्यक्रमाला बापूसाहेब पठारे यांची हजेरी! नागरिकांना दिल्या शुभेच्छा
राजदीप सरदेसाई यांनी देखील त्यांच्या पुस्तकात एक मोठा दावा केला होता, की ईडीपासून वाचण्यासाठी छगन भुजबळ भाजपसोबत गेले होते. त्यावर छगन भुजबळ यांनी हे दावे फेटाळले आहेत. विकासासाठी सरकारसोबत गेल्याचं भुजबळ म्हणाले आहेत. त्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील छगन भुजबळ ईडीला घाबरून भाजपमध्ये गेल्याचा दावा केलाय.