Muralidhar Mohol On NIA Raid in Pune : पुण्यातल्या कोंढवा परिसरात एका इमारतीच्या चौथ्या आणी पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवाईचे प्रशिक्षण दिलं जात होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) कारवाई केली आहे. यानंतर भाजपचे नेते व पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. […]
पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे असतानाच आता राष्ट्रवादीही या जागेसाठी इच्छूक असल्याचं बोललं जातंय. असं असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे लोकसभेच्या जागेबाबत मोठं विधान केलं आहे. काँग्रेस आत्तापर्यंत मन मोठंच करत आलंय, सध्या निवडणुका लागलेल्या नाहीत त्यामुळे यावर चर्चा नको, असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. नाना पटोले यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद […]
Pune Scam : जास्त व्याज देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक केली जात आहे. राज्यात असे अनेक प्रकार घडत आहे. आता पुण्यात गुंतवणूकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तब्बल सातशे कोटींची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत विशाल फटे याने तब्बल पाचशे कोटींच्या फसवणूक […]
Pune Corporation : पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापुर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची अनेक वर्षांपासुनची मागणी होती. यावर आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करताना वार्षिक भाड्यातून १०% ऐवजी १५% सवलत आणि मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी मालमत्तेचा वापर […]
Pune Criem : दिवसेंदिवस पुण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. कधी रिक्षाचालकाकडून विनयभंग, महाविद्यालयात छेडछाड तर घरेलू हिंसा याबरोबरच आता नागरिकांनी गजबजलेल्या मॉलमध्ये देखील महिलांना असुरक्षित वाटू लागेल, असा प्रसंग पुण्यातील विमाननगर परिसरातील मॉलमध्ये एका तरुणी सोबत घडला आहे. किराणा मालाची खरेदी करण्यासाठी विमाननगर परिसरातील फिनिक्स मॉलमधील स्टार बाजारमध्ये खरेदीस गेलेल्या तरुणीचा अश्लिल व्हिडीओ […]
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) आवारात बेकायदा रॅप गाणे (Rap song) चित्रीकरण प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) तक्रार अर्ज देण्यात आला आहे. (Pune Police) संबंधित तरुणांनी तलवार, रिव्हॅाल्वर तसेच अश्लील शब्दांचा वापर केल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांकडून रॅप गाणे चित्रित करणाऱ्या तरुणांची चौकशी सुरू केली आहे. शुभम […]