Ram Shinde : अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राम शिंदे ( Ram Shinde ) आणि निलेश लंके दोघेही इच्छुक उमेदवार आहे. खासदार सुजय विखे यांच्यावर कुरघुडी करण्याची एकही संधी हे दोघे कधीही सोडत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. लंकेंच्या प्रतिष्ठानतर्फे नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महानाट्यास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी यंदा कोणतीही तडजोड होणार […]
“सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचं आहे का?” असा संतप्त सवाल विचारत शिवसेनेचे (Shivsena) वाघ म्हटले जाणाऱ्या रामदास कदम यांनी महायुतीतील वाद महाराष्ट्रासमोर आणलाय. हा सवाल जरी एका ओळीचा असला तरी त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीमध्ये किती टोकाचे वाद सुरु असावेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra […]
आघाडी-युतीमध्ये निवडणूक लढवताना सर्वात कळीचा मुद्दा ठरणारी गोष्ट म्हणजे जागा वाटप. कोण, किती अन् कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार या प्रश्नाचे उत्तर शोधताना पक्षाची आणि नेत्यांची पुरती हौस फिटते. त्यानंतर येणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिथून उमेदवार कोण असणार? तो उमेदवार आर्थिकदृष्ट्या सृदृढ असावा, नेता म्हणून ओळखला जावा, लोकसंपर्क असावा आणि सर्वात महत्वाचे निवडून येण्याची क्षमता […]
Rupali Chakankar On Amol Kolhe : बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांबरोबर इतर पदाधिकारी एकमेंकाना आव्हान देत आहे. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. महायुतीकडे 200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एवढी ताकद असतानाही मित्रपक्षाकडून उमेदवार […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी ( Loksabha Elections 2024 ) बारामती मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी घोषित केल्याचे सांगितले जात आहे. कारण त्यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर शरद पवार सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पक्षाने निवडणूक चिन्ह असलेलं बॅनर त्यांनी स्टेटस वर […]
Amol Kolhe On BJP : पाच वर्षे माझ्यासारख्याकडे कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्याला हीच कामाची पोचपावती असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी फटकेबाजी केली आहे. तसेच महायुतीकडे 200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एवढी ताकद असतानाही मित्रपक्षाकडून उमेदवार आयात करावा लागतोयं, ही कामाची पोचपावती असल्याचंही कोल्हे म्हणाले आहेत. […]
मुंबई : राज्याचे बंदर विकास मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि कर्जतचे शिवसेना (Shivsena) आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा झाल्याचे वृत्त आहे. दोघांमध्येही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थोरवे यांनी भुसे यांच्याकडे काही कामांची यादी दिली होती. या कामांबाबत थोरवे यांनी विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला आणि […]
मुंबई : सहकार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्याने राज्य सरकारने जवळपास 40 हजार सहकारी संस्थांच्या (cooperative societies) निवडणुकांना (Elections) 31 मे पर्यंत स्थगिती दिली आहे. काल (29 फेब्रुवारी) विधानभवनात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या निर्णयाचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला आहे. केवळ ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा अर्ज […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीने जागा वाटप आणि उमेदवारांची नावे जवळपास अंतिम केली आहेत. यातील 13 नावांची संभाव्य यादी ‘लेट्सअप मराठी’च्या हाती लागली आहे. यात काही मतदारसंघांमध्ये अत्यंत धक्कादायक नावे समोर येत आहेत. याठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत भाजप (BJP) नवख्यांना उमेदवारी देण्याच्या तयारी असल्याचे दिसून येते. (BJP-Shiv Sena-Nationalist Congress alliance has finalized the […]
Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने ‘अबकी बार 400 पार’चा नारा दिला आहे. तर महाराष्ट्रातही महायुतीने 45+ चा नारा दिला आहे. अशात आता महायुती हे टार्गेट गाठू शकते, महायुतीचा 45 जागांवर विजय होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे. झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये हा अंदाज बांधण्यात आला आहे. झी मीडिया-मॅट्रिझच्या ओपिनिअन पोलमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही […]