Babanrao Gholap resigns from Shivsena UBT : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. उपनेते राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिवसेनेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. घोलप हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून घोलप यांच्या नाराजीच्या चर्चा […]
Supreme Court strikes down electoral bonds scheme : इलेक्टोरल बाँडच्या प्रकरणात (Electoral Bonds) सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. मतदानाच्या अधिकारासाठी माहिती आवश्यक आहे. राजकीय पक्ष निवडणूक प्रक्रियेतील संबंधित घटक आहेत आणि निवडणुकीच्या निवडीसाठी राजकीय पक्षांच्या निधीची माहितीही आवश्यक आहे, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे. इलेक्टोरल बाँडच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात […]
Lok Sabha Election : देशात आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास (Lok Sabha Election) सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. कोणती जागा कुणाला द्यायची याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही मात्र नेते मंडळींकडून दबावाचे पॉलिटिक्स सुरू आहे. या लोकांनी कितीही दबाव आणला तरीही संबंधित उमेदवाराच्या विजयाचे गणित पाहूनच तिकीट फायनल होणार […]
Jitendra Awhad vs Amol Mitkari : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाचे नेते अजित पवारांवर तुटून पडले आहेत. अजितदादांवर घणाघाती टीका केली जात आहे. यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आघाडीवर असून जोरदार प्रहार करत आहेत. आताही त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लक्ष्य करत टोचणारी टीका केली. ही टीका अजित पवार गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली […]
Lok Sabha Election : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच ओबीसी आरक्षणानेही (OBC Reservation) उचल खाल्ली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा (Maratha Reservation) करण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन आता एका राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ओबीसी बहुजन पार्टी हा […]
Kansas Shooting : अमेरिकेत काही केल्या गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. माथेफिरूंकडून होणाऱ्या (Kansas Shooting) गोळीबारात निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. अमेरिकेत अनिर्बंध पद्धतीने (America) वाढलेल्या गन कल्चरचे हे साईड इफेक्ट आता दिसू लागले आहेत. आताही अमेरिकेतील कॅन्सस शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत दोघा जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ मुलांसह 22 […]
Rohit Sharma T20 World Cup Captain : आगामी टी 20 विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाने (T20 World Cup) तयारी सुरू केली आहे. विश्वचषकासाठी अद्याप वेळ आहे मात्र त्याआधीच संघाचा कॅप्टन कोण असेल याचं उत्तर मिळालं आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या मैदानाबाहेर आहे. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठ्या कालावधीनंतर टी 20 मध्ये शानदार कमबॅक केलं […]
NCP MLA Disqualification Case : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष (Election Commission) आणि चिन्ह अजित पवार गटाला सुपूर्द केल्यानंतर पक्षातील आमदारांचे प्रकरण चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी (NCP MLA Disqualification Case) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर (Rahul Narwekar) सुरू आहे. या प्रकरणात नार्वेकर निकाल देणार आहेत. त्यामुळे दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे. […]
Vibhakar Shastri Join BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश घेतला. या मोठ्या धक्क्यातून सावरत असतानाच काँग्रेसला आणखी (Congress) एक धक्का बसला आहे. हा धक्का उत्तर प्रदेशात बसला आहे. देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी (Vibhakar Shastri Join BJP) काँग्रेसची साथ सोडत भाजपात प्रवेश […]
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारांची (Rajya Sabha Election) घोषणा केली. काँग्रेस सोडून भाजपात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchade) या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेस सोडून भाजपात आलेले माजी खासदार […]