नवी दिल्ली : भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते तरूण चेहरा आणि कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यांने त्यांचे X वरील प्रोफाइलच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. 2019 मध्ये अशाच पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या प्रोफाईलवर ‘मी चौकीदार’ असे लिहिले होते. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या X प्रोफाईच्या बायोमध्ये ‘मी मोदीचे कुटुंब’ असे […]
शिरूर : अरे हो की बाबा झाली चूक, मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल असे म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) आमदार अशोक पवारांचा समाचार घेतला आहे. ते शिरूरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर, नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू असेही अजित पवार म्हणाले आहेत. […]
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक राजकीय गणित बदलली आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राणा आणि भाजपच्या सर्व मित्र […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आज (दि.4) 1998 मध्ये विधानसभेत भाषण करण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी लाच घेणाऱ्या आमदार, खसदारांना कायदेशीर खटल्यापासून बचाव करणारा कायदा रद्द केला आहे. त्यामुळे सभागृहात लाच घेऊन मतदान करणे किंवा भाषण करणे आता खासदार-आमदारांना महागात पडणार असून, अशा नेत्यांवर कायदेशीर खटला चालवला जाणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय […]
पुणे : ज्येष्ठ उद्योगपती आणि माणिकचंद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रसिकलाल माणिकचंद धारीवाल (Rasiklal Dhariwal) यांच्या जयंतीनिमित्त (दि.1 मार्च) शिष्यवृत्ती वितरण आणि रक्तदान शिबीर संपन्ना झाला. यावेळी सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरनं हजेरी लावत रक्तादात्यांचा उत्साह वाढवला. तर, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात नशेच्या आहारी जाऊ नये, तसेच आपण निवडलेल्या अभ्यासक्रमातून देशसेवा करावी, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद […]
पुणे : पुनित बालन ग्रुपतर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स संघाने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाला पराभूत करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदावर नाव कोरले. सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई पॉवर हिटर्सच्या हुमेद खान याच्या […]
बारामती : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेकदा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजितदादा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांसाठी एका मंचावर आले पण त्यांनी एकमेकांशी संवाद साधणं टाळल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. त्यानंतर आज (दि.2) बारामतीत नमो महारोजगार मेळाव्यात या दोन्ही नेत्यांमधील दुरावा अधिक वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. बारामतीतील कार्यक्रमाच्या मंचावर अजितदादा आणि पवारांच्या मध्यभागी एकनाथ शिंदे आणि […]
‘Relieve me of my political duties’: Gautam Gambhir urges BJP chief : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir ) शनिवारी (दि. 2) त्याच्या X अकाउंटवरून ट्विट करत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहे. याबाबत त्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांना राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या […]
Ultra-Processed Foods : अल्ट्रा-प्रोसेस फुडच्या सेवनामुळे 32 प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका संभवू शकतो असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स यांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासातून हे अधोरेखित करण्यात आले आहे. अल्ट्रा-प्रोसेस प्रक्रिया (Ultra Processed food) केलेल्या पदार्थ अनेक प्रक्रियांमधून जातात. तसेच यात रंग, इमल्सीफायर्स, फ्लेवर्स […]
नागपूर : आगामी लोकसभेसाठी राज्यात जागावाटपांच्या चर्चांना काही प्रमाणात पडद्यामागे चर्चांच्या फेऱ्यांना सुरूवात झाली आहे. एकीकडे राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लोकसभेसाठी निवडणुकांच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, अद्याप महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मविआत जागा वाटपांवरून तु-तु मै-मै सुरू आहे. या सर्वामध्ये प्रकाश […]