महायुतीच्या विकासकामांवर विश्वास ठेऊन 5 उमेदवार बिनविरोध; आमदार जगताप यांचं मतदारांना आवाहन
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मतदारांच्या मनात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती)च्या उमेदवारांबाबत ठाम विश्वास आणि शाश्वती आहे.
MLA Sangram Jagtap made an important appeal to the citizens of the city : आजपासून अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप(MLA Sangram Jugtap) यांनी माध्यमांशी संवाद साधला. उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असून, त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी अधिक वेगाने सुरू झाली आहे. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मतदारांच्या मनात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (Mahayuti)च्या उमेदवारांबाबत ठाम विश्वास आणि शाश्वती आहे. याच विश्वासाच्या जोरावर महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, हे जनतेच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले आहे. जनतेचा स्पष्ट कौल महायुतीच्या बाजूने असल्याचे या बिनविरोध निवडींवरून दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शहरामध्ये आतापर्यंत जी विकासकामे झाली आहेत, त्याबाबत मतदार समाधानी आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा, पायाभूत विकास अशा विविध क्षेत्रांत महायुतीच्या उमेदवारांनी केलेल्या कामांवर नागरिकांचा विश्वास आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीतही मतदार महायुतीच्या उमेदवारांनाच निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबात उमेदवारी अन् रवींद्र चव्हाणांची टीका, अजित पवारांचं थेट उत्तर
विकासाची ही घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी महायुतीला पुन्हा संधी देणे आवश्यक असल्याचे सांगत, आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले.
