Rajabhau Shirguppe : साहित्य क्षेत्रामधून मोठी बातमी समोर आली आहे.ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना कोल्हापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. एका लव्हस्टोरीचा द एन्ड : सचिन पायलट, सारा यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आले उघडकीस राजाभाऊ शिरगुप्पे मूळचे निपाणीचे होते. […]
Maratha Reservation : राज्य सरकार उद्यापासून कुणबी दाखल्याची (Maratha Reservation) वाटप करणार आहे. पण सरकारच्या या भूमिकेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध केला आहे. सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी वाटू नयेत आणि वाटू दिले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. […]
मुंबई : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. (Shinde government’s decision […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच ते म्हणाले की, आरक्षण मिळत राहिलं. हे सगळं तुमचंच श्रेय आहे. फक्त तुम्ही तब्येत सांभाळा बाकी काही नाही. काय म्हणाले नितेश राणे? यावेळी नितेश राणे म्हणाले की, नमस्कार, कसं काय? […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला असून राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच राज्यातील काही आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊना आपला राजीनामा दिला आहे. तर, काहींना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. Sensex; दोन दिवसांच्या वाढीनंतर सेन्सेक्स पुन्हा घसरला, पण गुंतवणूकदारांचे भांडवल […]
Nilesh Lanke : राज्यात (Maharashtra)मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)मुद्दा चांगलाच पेटला आहे. राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच राज्यातील काही आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन आपला राजीनामा (Regignation)दिला आहे. तर, काहींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन (special session)बोलावण्याची मागणी केली आहे. Maratha Reservation : […]