Ahmednagar News : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी यांना एका खासगी प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने फरार घोषित केले आहे. सुवेंद्र गांधी यांना पकडून तीन दिवसांत न्यायालयात हजर करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हॉटेल व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना दिल्लीतील गणपती ट्रेडर्सकडून 2011 साली सुवेंद्र गांधी यांनी 8 कोटी रुपयांचे कर्ज घेतले […]
Solapur Hotel Owner Suicide : सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अजिंक्य जयवंत राऊत (वय 55 वर्षे ) असं या हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे. सोलापुरातील लेडी डफरिन (इंदिरा गांधी) चौक ते जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाच्या दरम्यान हॉटेल ध्रुव हे राऊत यांचं हॉटेल आहे. त्यांच्या […]
Free treatment in Public hospitals : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Department of Public Health) सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याची मागणी होत होती. दरम्यान, आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे. आज राज्य सरकाराने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये […]
डीआरडीओचे अधिकारी प्रदीप कुरुलकरांचा खटला देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत का चालवला नाही? असा खडा सवाल आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला आहे. सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना प्रश्नोत्तरांच्या तासात धारेवर धरलं जात आहे. दरम्यान, हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेले प्रदीप कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाऐवजी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत खटला सुरु आहे. त्यावरुन जयंत पाटील […]
बुलढाणा : नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. त्यामुळे नेतृत्वाने माझे पंख छाटण्याचे प्रयत्न करु नयेत, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant tupkar) यांनी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना दिला आहे. लेट्सअप मराठीशी त्यांनी विशेष संवाद साधला. त्यावेळी ते बोलत […]
मुंबई : “शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो. आता तुम्ही ठरवा न्याय देणार आहात का?” अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाला आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना चिमटे काढले. विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी आमदार विजय वडेट्टीवर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात फडणवीस बोलत होते. दरम्यान, […]