अहमदनगर : गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तिथं गोंधळ हे एक समीकरणच बनलंय. मागील काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवरुन घमासान सुरु आहे. अशातच अहमदनगरमधील राहाता इथल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं समोर आलं आहे. गौतमी पाटील स्टेजवर आपलं नृत्य सादर करीत असताना काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशांची उधळण केली आहे. राहता इथं सुरु असलेल्या गौतमी पाटीच्या कार्यक्रमात […]
उस्मानाबाद : उद्धव ठाकरे गटाला उस्माबादेत मोठा धक्का बसला आहे. भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचं संचालक पद अपात्र ठरवण्यात आले आहे. ज्ञानेश्वर पाटील यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असल्या कारणाने त्यांचं जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचं संचालक पद गेलं आहे. दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याचं कारण विभागीय सहनिबंधकांकडून देण्यात […]
अहमदनगर : गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी (Talathi)पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांनी तलाठी भरती (Talathi Bharti) आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. येत्या काही दिवसांमध्ये चार हजार तलाठी पदांची भरत करणार असल्याचं राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले होतं. दरम्यान, […]
मुंबई : आमदारांना फोडून भाजपने ठाकरेंची सत्ता घेतली… जनता धडा शिकवेल!सोबत गेलं तर धुतलं तांदूळ अन् आमच्यासोबत तांदळाचे खडे, हा कुठला न्याय या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं आहे. ठाकरे यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी ऑनलाईन संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ठाकरे म्हणाले, टिळक घराण्याचा वापर करुन […]
पुणे : महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली होती. आता तेच लोकं दुटप्पी भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करत होते. विद्यार्थ्यांची मागणी रास्त असून त्यांना पुरेसा वेळ दिला जावा म्हणून आम्ही काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थ्यांच्या बाजुचा निर्णय घेतला होता. तसेच आयोगाला नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू […]
मुंबई : काँग्रसेच्या महाअधिवेशनात अडथळे आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न अधिवेशन होणारच, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. पटोले म्हणाले, काँग्रेसचं रायपूर इथलं महाअधिवेशन सुरुळीत पार पडू द्यायचे नाही, असा चंग बांधूनच सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून नाहक त्रास दिला जात आहे. रायपूरमधील काँग्रेस नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे मारण्यात आले, त्यात त्यांना काहीच मिळाले नाही. […]