ठाकरे अन् काँग्रेसवर शरद पवारांची नाराजी : पक्षनेत्यांनीही केली तक्रार

ठाकरे अन् काँग्रेसवर शरद पवारांची नाराजी : पक्षनेत्यांनीही केली तक्रार

मुंबई : स्वतंत्रपणे जागा जाहीर केल्याने आणि वाद असूनही सांगलीच्या (Sangli) जागेवर उमेदवार जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) मुंबईतील पक्ष कार्यालयात तब्बल साडेतीन तास झालेल्या बैठकीत नाराजी बोलून दाखवली असल्याचे समजते. जागावाटपाची चर्चा अजूनही सुरू असताना काँग्रेस आणि ठाकरे यांनी स्वतंत्रपणे जागा का जाहीर केल्या याबाबत राष्ट्रवादीच्या पक्षनेत्यांनी पवारांकडे तक्रार केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्याच्या अनुषंगाने काल (27 मार्च) राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची केंद्रीय संसदीय समितीची बैठक मुंबईत पार पडली. पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह संसदीय समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत येण्यासाठी पुन्हा विनंती करण्याबाबतही चर्चा झाली. (Sharad Pawar is angry with the Congress and Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) for announcing the seat separately and announcing a candidate for the Sangli seat despite the controversy)

एकनिष्ठा कुठंवर ठेवायची? मी लढणारच! ठाकरेंना इशारा देत करंजकरांकडून बंडखोरीची संकेत

याचवेळी ठाकरे आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे जागा जाहीर केल्याच्या प्रकारावर आक्षेप घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन संयुक्त पत्रकार परिषद घ्यायला हवी होती. अंतर्गत बैठकीत महाविकास आघाडीचे मित्रपक्ष युती धर्माचे पालन करत नाहीत, असा सूर या पक्षाच्या बैठकीत होता. तसेच सांगलीच्या जागेबाबत चर्चा सुरु असतानाच ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कशी जाहीर केली? असा सवालही विचारण्यात आला. दरम्यान, काँग्रेस अन् ठाकरेंनी स्वतंत्रपणे उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर शरद पवार हेही स्वतंत्रपणेच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत.

विजय शिवतारे यांचे बंड शमले : अजितदादा यांच्या शेजारी उभे राहून खळखळून हसले

काँग्रेस अन् ठाकरेंकडून उमेदवारांची घोषणा :

काँग्रेसने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि रामटेक अशा जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. तर ठाकरे यांनीही मुंबईतील चार मतदारसंघांसह नाशिक, सांगली, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे अशा जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज