Download App

Jayant Patil : मागासवर्गीयांचा निधी शिंदे-फडणवीस सरकारने कापला; पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil Criticise Shinde Goverment :  विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या तरतुदीमध्ये सध्याच्या सरकारने मोठी कपात केली आहे. याचा फटका मागासवर्गीयांच्या अनेक योजनांना बसला आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संजय राऊत म्हणत होते ते हेच दंगे का ? ; सोमय्यांकडून राऊत टार्गेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची मूळ अर्थसंकल्पातील तरतूद १२०० कोटींवरून ८४० कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या तरतुदीमध्येही कपात, ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची मूळ अर्थसंकल्पातील असलेली १०० कोटी रुपयांची तरतूद कमी करून १० कोटी करण्यात आली याबाबींकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

बापटांच्या जागी कोण? सूनबाईंपासून मोहोळ, मुळीक यांसह अनेक नावे चर्चेत

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात सुरु असलेल्या विकासकामांना राज्यात आलेल्या नव्या सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. पण या स्थगितीवर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यावर उच्च न्यायालयाकडून स्थागिती उठवण्यात आली आहे. या निर्णयावर रोहित पवार यांनी “सत्यमेव जयते! विकासाच्या वाटेत पाय घालणारेच तोंडावर आपटले!” असं ट्विट करून सरकारला टोला लगावला आहे.

Tags

follow us