मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूतची सेक्रेटरी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर राजकीय नेत्यांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात येत आहेत. विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील भाजपच्या विधानसभा सदस्यांकडून हा मुद्दा जोरदार उचलून धरला असून दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याबाबत मागणी करण्यात आली. या मागणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
जळगाव : ‘माझ्या पॅनलच्या पराभवाचे राजकीय भांडवल करू नका. गिरीश महाजन व गुलाबराव पाटलांनी कधीही माझ्या विरोधात कारस्थान केलेले नाही. महाजन यांनी मला वडिलांसारखे मार्गदर्शन केले. या पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा त्यांनी माझी आस्थेने विचारपूस केली. अगदी पॅनल पडल्यावर लागलीच त्यांचा फोन आला. त्यामुळे कुणीही सी.आर. पाटील व गिरीश महाजन यांच्यात माझ्या पराभवाच्या आडून राजकीय गैरसमज […]
नागपूर : सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद भडकवणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या […]
नागपूर : आज नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं दिसून आलं. यावेळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांनी काळ्या पट्टया बांधून सरकारचा निषेधही केला. ‘बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’, ‘बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, सरकार हमको दबाती कर्नाटक […]
मुंबई : विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावरील कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करणार आहे. पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोषच केल्याचं पाहायला मिळालं. […]
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे यांचा तीन महिन्यातील हा दुसरा दौरा असल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलंय. तर एकीकडे हा दौरा पक्षसंघटनेसाठी असल्याचं बोललं जात असतानाच ठाकरे नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान कोणाशी भेट घेणार का? […]