पुणे : दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा जीआर काढला आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. आता सरकारच्या या निर्णयाविरोधात छावा मराठा युवक महासंघ (Chhawa Maratha Youth Federation) आक्रमक झाला आहे. आज या संघटनेनं पिंपरी-चिंचवड तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढून या आदेशाला विरोध केला. राज्यातील गट ब, क […]
Ajit Pawar Vs Sharad Pawar : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पक्ष बांधणीसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत.अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात शरद पवारांनी स्वाभिमान सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांंना प्रत्युत्तर म्हणून अजित पवार यांनी उत्तरदायित्व सभा घेतल्या आहेत.पक्षातील बंडखोरीनंतर शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात कोणतीही सभा घेतली नव्हती. […]
पुणे : सर्वपक्षीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यानचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावरून विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्य सरकरला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर, शिंदेंचा व्हायरल होणारा व्हिडिओ खरा असेल तर, महागात पडेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या सर्वांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी […]
Anna Bansode Letter : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या भोजन आणि दुध पुरवठ्याच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार बनसोडे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. वारंवार तक्रार करुन ही दखल […]
पुणे : पुण्यात उद्यापासून (दि.14) तीन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैककीत 36 संघटनांचे 266 प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून, राष्ट्रीय आणि सामाजिक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. […]
पुणे : खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच चांगलेच राजकारण रंगले आहे. पंचायत समितीच्या परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा रद्द झालेला प्रस्ताव पुन्हा तयार करून नव्याने सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर मध्यवर्ती इमारतीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा प्रस्ताव तयार […]