राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी मतदारसंघ पिंजून काढलायं.
देवेंद्र फडणवीस यांनी आता तुम्हाला ठेका दिलायं का? असा प्रतिप्रश्न मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना केलायं.
राज्यातील महिलांना महिन्याला 3 हजार आणि मोफत बस देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलीयं. ते मुंबईत बोलत होते.
श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून 'मशाली' च्या माध्यमातून श्रीगोंद्यात विजयाचा प्रकाश उजळणार असल्याचं चित्र दिसत आहे.
शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलंय. ते सांगलीत आयोजित सभेत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आपला जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. जाहीरनाम्याला 'जोशाबा समतापत्र' असं नाव देण्यात आलंयं.
आश्रमशाळांच्या रंगरंगोटी, डागडुजी आणि पुनर्बांधणी वर भर दिला. त्यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणाऱ्या आश्रमशाळा निर्माण केल्या.
पूर्वीच सरकार बहिरं होतं, फक्त मेरी आवाज सुनो एवढंच माहित होतं, घरात बसून फेसबुक चालवून राज्य चालवता येत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवलायं.
अजितदादांसोबत मांडीला मांडी लावून बसल्यावर मला श्वास घेता येत नव्हता, आता शिंदेंना काहीच करता येत नाही, अशी सडकून टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलीयं.
व्यासपीठावरच उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी सांगितलं होतं, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलायं.