अमोल भिंगारदिवे 'लेट्सअप मराठी' ऑनलाईनमध्ये मल्टिमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ऑनलाईन पत्रकारिता क्षेत्रात 5 वर्षांचा अनुभव तसेच दैनंदिन बातम्या, राजकीय घडामोडी, क्राईम स्टोरीज यांसारख्या बातम्यांमध्ये रस.
तिजोरीतल्या पैशांची उधळपट्टी पण जमिनीधारकांना द्यायला नाहीत, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला पुन्हा एकदा चपराक दिलीयं.
माझ्या वडिलांसह शहीदांचा अपमान झाला असल्याचं भाष्य माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांग्लादेश सोडल्यानंतर पहिल्यांदाच भाष्य केलंय.
महिला कुस्तीपट्टू विनेश फोगटच्या याचिकेवर तारीख पे तारीख देण्यात येत असून आता येत्या 16 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे.
राज्यात 17 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत.
आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावणं शरद पवारांचं हे आवाहन म्हणजे लबाडाघरचं आमंत्रण असल्याची बोचरी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.
छगन भुजबळसारख्या पैदाशी आडव्या येत असतील तर पाडा, असे आदेशच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, पैसे परत घेणार नाही, अशी सारवासारव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त विधानावर केलीयं. ते जळगावमध्ये बोलत होते.
पैसे परत घेऊनच दाखव, तुझा कार्यक्रमच करते, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रवि राणा यांना धमकावलंय.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया बड्या कर्जदारांवर मेहेरबान झाली असून तब्बल 84 हजार कोटी रुपयांच्या कर्जावर पाणी सोडलं असल्याची माहिती बॅंकेचे शेअर होल्डर विवेक वेलणकर यांनी दिलीयं.
मी गंमतीने बोललो, असल्याचं स्पष्टीकरण आमदार रवी राणा यांनी दिलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.