मुंबई : देशाचे राजकारण काल (18 जुलै) दोन शहरांमध्ये एकवटले होते. भाजपच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची काल दिल्लीत बैठक पार पडली. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील आधीच्या युपीएची आणि आताच्या INDIA ची बैठक बंगळुरुमध्ये पार पडली. दोन्ही बैठकांमध्ये आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांच्या या राजकीय कुस्तीमध्ये सहभागी न […]
दिल्ली : भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची काल (18 जुलै) बैठक पार पडली. भाजपचे जवळपास 38 मित्रपक्ष बैठकीत सहभागे झाले होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र या बैठकीनंतर दिल्लीत अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत खास बैठक पार पडली असल्याची माहिती […]
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बारामतीचा (Baramati Loksabha) बालेकिल्ला सर करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा, उमेदवार चाचपणी, अजितदादांना सोबत घेणे यानंतर आता भाजपने बारामतीसाठी स्वतंत्र शिलेदार नेमला आहे. भाजपने पुणे जिल्हाध्यक्ष ग्रामीण (बारामती) म्हणून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते वासुदेव काळे यांची नियुक्ती केली आहे. काळे […]
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ लोकांसमोर आणणाऱ्या लोकशाही चॅनेलचे प्रक्षेपण बंद आहे. मागील काही तासांपासून चॅनेल ऑन एअर सेवा ठप्प झाली आहे. मात्र चॅनेलचे युट्यूब माध्यमातून प्रसारण सुरु आहे. दरम्यान, हा माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचा आरोप शिवसेना (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. मात्र ही सेवा काही तांत्रिक अडचणींमुळे […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर 8 बंडखोर आमदारांच्या शपथविधीवेळी राजभवनात उपस्थित असलेल्या 21 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. हकालपट्टी झालेले सर्व पदाधिकारी हे प्रमुख जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष किंवा प्रमुख शहरांचे शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष आहेत. (21 office bearers who close aid to Deputy Chief […]
मुंबई : आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने अडचणीच आलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याशी संबंधित एक पेनड्राईव्ह उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे सादर केला. यामुळे सभागृहात खळबळ उडाली आहे. यावेळी “लाव रे तो व्हिडीओ” अशा घोषणांनी […]
मुंबई : प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाबाबतचा नवा डाव टाकला आहे. काल (17 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आज (18 जुलै) त्यांची भूमिका जाहीर केली. “मुख्यमंत्री अडचणीत आहेत, मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. मी मंत्रिपदाचा दावा सोडत आहे हे मी आज जाहीर करतो. मला मंत्रालय […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाह 9 मंत्री आणि बंडखोर नेत्यांनी काल (16 जुलै) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी, पक्ष एकसंघ रहावा, यासाठी मंत्री आणि आमदारांनी शरद पवार यांना विनंती केली, […]
मुंबई : महाराष्ट्रात आता लवकरच कॅसिनो (casinos) सुरु होण्याची शक्यता आहे. त्याबाबत शिंदे सरकारची (Shinde Government) तयारी पूर्ण झाली असून कॅसिनोंना परवानगी देणारे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या वस्तू आणि सेवा कर कौन्सिलच्या 50 बैठकीत ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवरील कर 18 टक्क्यांवरुन 28 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. याचा […]
मुंबई : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan center Mumbai) हे मागील दोन ते तीन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर इथे झालेला राजकीय गोंधळ अवघ्या महाराष्ट्राने पाहिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार […]