कधी हाताला, तर कधी पायाला फ्रॅक्चर, मराठी कलाकारांसाठी जून महिना ठरतोय काळजीचा!

Marathi artists साठी जून महिना चिंतेचा ठरतोय. कलाकारांच्या धावपळीला दुखापतीची किनार लागलीय तर काहींना फ्रॅक्चरचा सामना करावा लागला आहे.

7f6e37c0 1dfd 4d95 9e2f 8015fa2b4b48

7f6e37c0 1dfd 4d95 9e2f 8015fa2b4b48

Sometimes in hand, sometimes fracture in leg, June is shaping up to be a worrying month for Marathi artists : मराठी मनोरंजनविश्वासाठी जून महिना काहीसा चिंतेचा ठरत आहे. कलाकारांच्या सातत्यपूर्ण धावपळीला दुखापतींची साथ लाभली असून, काहींना तर थेट फ्रॅक्चरचा सामना करावा लागला आहे. तरीही काही कलाकारांनी “शो मस्ट गो ऑन” ही भावना जपताना आपल्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या आहेत.

अरुण तनपुरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; पुतणे प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेणार?

सुशील इनामदार या अभिनेत्याला ‘शिकायला गेलो एक’ या नाटकात महत्त्वाची भूमिका बजावत असताना जूनच्या सुरुवातीलाच त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले. तरीही, नाटक थांबू नये म्हणून तो अपार जिद्दीने मंचावर उभा राहिला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी

शलाका पवारला ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ नाटकाच्या दरम्यान पायाला लोखंडी वस्तू लागून दुखापत झाली, तरीही नाटक सुरू ठेवण्यासाठी तिची झटपट सुरूच आहे.

माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीची दुसरी फेरी सुरू, २१ पैकी १७ जागी ‘दादा’ पॅनल आघाडीवर

भावना बलसावर ही ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांची मुलगी आहे. भावना हिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने ती ‘शिर्डीवाले साईबाबा’ या मालिकेतून काही काळासाठी विश्रांतीवर आहे.

इंग्लंडची विजयी सलामी; भारतावर 5 विकेट्सने मात, शुबमनने फलंदाजांवर फोडल पराभवाचं खापर

प्रार्थना बेहरेच्या गुडघ्यावर दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, तीही सध्या सक्तीच्या विश्रांतीवर आहे. त्याचबरोबर गिरीजा ओक च्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, मेष राशीच्या लोकांनी बुधवारी महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत, अन्यथा त्यांचे नुकसान होईल

या सर्व घटना पाहता, जून महिना मराठी कलाकारांसाठी शारीरिक आणि मानसिक कसोटीचा काळ ठरत आहे. पण या काळातही त्यांची जिद्द, नाट्यप्रेम आणि व्यावसायिकता यांना सलाम करावा लागेल.

Exit mobile version